Ajit Pawar News : 'शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, मग अजितदादा कोण?' बच्चू कडूंचा अमित शहांना सवाल

Bacchu Kadu On Amit Shah : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.
MLA bacchu kadu on Amit Shah and ajit pawar over Criticizing Sharad Pawar on corruption
MLA bacchu kadu on Amit Shah and ajit pawar over Criticizing Sharad Pawar on corruption
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर कडाडून टीका केली. यावेळी शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. दरम्यान अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या या टिकेवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कडू काय म्हणाले?

अमित शहा यांनी पुण्यात बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असून त्यांनी सरकारमध्ये असताना भ्रष्टाचाराचे संस्थात्मकीकरण केल्याचा आरोप केला अमित शहा यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी सवाल उपस्थित केला की, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहेत? अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघाले असतील ते विसरभोळे आहेच बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर अंगलट येते. असा खोचक टोला देखील बच्चू कडूंनी शहा यांना लगावला. तसेच पुढे बोलताना, शरद पवार भाजप सोबत जाणार नाही. अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्या सोबत जाऊ नये असेही बच्चू कडू म्हणाले.

MLA bacchu kadu on Amit Shah and ajit pawar over Criticizing Sharad Pawar on corruption
Ajit Pawar: अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्ट्राचाराचे सरदार, भाजपसोबत असलेल्या अजितदादांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. गृहमंत्री ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत त्यांना याच मोदी सरकारने पद्म विभूषण देऊन गौरव केला आहे. भाजप ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यामधील जास्ततर आज भाजपमध्ये आहेत. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, शहा यांचं विधान ऐकून मला हसू आलं, कारण याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्म विभूषण देऊन सन्मानित केले होते. अमित शहा यांचा मागे कार्यक्रमात अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. म्हणूनच भाजपने ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्यापैकी ९० टक्के लोक आज वॉशिंग मशीनमुळे भाजपमध्ये आहेत.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की भाजपने एकदा ठरवावे की शरद पवार अखेर काय आहेत? दुसरी गोष्ट ते १२ नेते ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सर्व आज महाराष्ट्रा सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे भाजपने आधी निश्चीत करावं की या देशात भ्रष्टाचारी कोन आहे? भाजप कदाचीद याबद्दल कन्फूज आहे कारण त्यांच्याच सरकारने पवार साहेबांना सन्मानित केले होते.

MLA bacchu kadu on Amit Shah and ajit pawar over Criticizing Sharad Pawar on corruption
माजी सैनिकाने ६ महिन्यांच्या चिमुरड्यासह कुंटुंबातील ५ जणांना संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.