Bhaskar Jadhav : 40 आमदार, 13 खासदार फोडून देखील..; भास्कर जाधवांनी शिंदे गटाला दिला स्पष्ट इशारा

भारतीय जनता पक्षाला (BJP) या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत.
MLA Bhaskar Jadhav
MLA Bhaskar Jadhavesakal
Updated on
Summary

मुस्लिम समाजाने डोकी भडकवून घेऊ नका. तुम्ही त्यांचा हेतू यशस्वी करता आहात. त्यांना औरंगजेबाच्या नावाने राजकारण करायचे आहे.

गुहागर : भारतीय जनता पक्षाला (BJP) या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकायच्या आहेत; मात्र शिवसेनेला हरवणे तुमच्या बापाला जमणार नाही.

वर्षभरानंतर आमचे दिवस येतील, त्या वेळी तुमचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मेळाव्यात केले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेने निषेध मोर्चा काढला.

MLA Bhaskar Jadhav
Karwar : पत्नी, मुलाला नदीत ढकलून व्यावसायिकानं स्वत: लावून घेतला गळफास; घटनेने कारवारात खळबळ

शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो, ५० खोके खातात बोके, अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी आदी घोषणा देत हा मोर्चा गुहागर तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला. आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन दिले.

MLA Bhaskar Jadhav
Bus Accident : मुलाला महाविद्यालयात सोडून परतताना काळाचा घाला; बस दुर्घटनेत गंगावणे कुटुंब होरपळले

त्यानंतर भंडारी भवन येथे मेळाव्यात ते बोलत होते. जाधव म्हणाले, गेल्या काही वर्षात मोर्चा, आंदोलने झाली; पण त्यात माझा सहभाग नव्हता. मी विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देत असतो. अनेक वर्षांनी आज मोर्चात सहभागी झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गुहागर तालुक्यात पूर्वीची शिवसेना पुन्हा एकदा उभी करू शकलो, याचे समाधान आज मला आहे.

MLA Bhaskar Jadhav
Uniform Civil Code : समान नागरी कायद्यातून RSS विचारांचा अजेंडा; NCP नेते म्हणाले, कायद्याला आमचा विरोध..

सर्व ठेकेदार त्यांच्या पसंतीचे हवेत म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि अन्य नेते विकासकामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. जलजीवनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना निधी देणे थांबवले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या माझ्या दीडशे कोटींच्या कामांना मिंधे सरकारने स्टे दिला आहे. हा स्टे उठवावा म्हणून आम्ही न्यायालयात गेलोय.

४० आमदार, १३ खासदार फोडूनदेखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना वाढत आहे. ही खरी भाजपची डोकेदुखी आहे. भाजपला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मुस्लिम समाजाने डोकी भडकवून घेऊ नका. तुम्ही त्यांचा हेतू यशस्वी करता आहात. त्यांना औरंगजेबाच्या नावाने राजकारण करायचे आहे. हिंदू, शीख, इस्लाम यांच्यात दंगली घडवायच्या आहेत.

MLA Bhaskar Jadhav
Kolhapur : उद्धव ठाकरेंचा फेसबुकवरूनच कारभार, म्हणून मराठा आरक्षण रद्द झालं; विखे-पाटलांनी सांगितली हकीकत

जनता माझ्या पाठीशी ठामपणे

मी महाराष्ट्रात फिरणार आहे त्या वेळी नारायण राणे, उदय सामंत, रामदास कदम, भाजपचे अन्य नेते माझ्या मतदार संघात कितीही वेळा येऊ द्यात माझ्या मतदार संघातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ही जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.