अजित पवारांना कोण ओळखतंय म्हणणाऱ्या राणेंना सेना आमदारांचं चोख प्रत्युत्तर

Narayan Rane-Ajit Pawar
Narayan Rane-Ajit Pawaresakal
Updated on
Summary

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना स्मृतिभ्रंश झाला आहे.

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यांची जिल्ह्यात असलेली दहशत मोडून काढत लोकांच्या मनातील भीती दूर करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळं राणे मला ओळखत नसतील तरी चालेल, पण अजित पवार (Ajit Pawar) कोण असे ते म्हणत असतील, तर त्यांनी उपचार करुन घ्यावेत, असा टोला आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला.

राणेंनी आता शांततेचं राजकारण करावं. मिळालेल्या केंद्रीय मंत्रीपदाचे सहा महिने असेच गेले. मी तरी चांदा ते बांदा योजना आणली. तुम्ही काय आणलं, असा सवाल उपस्थित करत मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग करा. आयुष्य हे क्षणभंगुर आहे, अशी टीकाही केसरकर यांनी केली. आमदार केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख रूपेश राऊळ, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, अनारोजीन लोबो, सुशांत नाईक उपस्थित होते.

Narayan Rane-Ajit Pawar
'नितेशला जामीन मंजूर होणार की नाही, हे सांगायला मी ज्योतिषी नाही'

केसरकर म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank) टिकली पाहिजे. ही बँक महाविकास पॅनलच्या ताब्यात आल्यास शिवराम भाऊ जाधव यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून आम्ही करत असलेल्या प्रचार आणि काम पाहता सर्वच्या-सर्व जागावर विजय होईल. मात्र, ज्या पद्धतीनं नारायण राणे यांच्याकडून जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली, ती चुकीची आहे. त्यांनी आता शांततेचं राजकारण करावं. ज्या वेळी आपल्याकडं मंत्रीपद होतं, त्यावेळी सतीश सावंत सारखा कार्यक्षम व्यक्ती आपल्या सोबत नव्हता. चांदा ते बांदा योजनेतून सिंधुदुर्गचा शेतकऱ्यांचा विकास केला असता. मात्र, आता सिंधुरत्न ही योजना लवकरच सुरू होणार आहे .त्यामुळं जिल्हा बँक ताब्यात यायला हवी. ती ताब्यात आल्यास सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरोघरी विकासात्मक योजना पोहोचवल्या जातील.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar
Narayan Rane-Ajit Pawar
'शंभर कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत'

केसरकर पुढे म्हणाले, नारायण राणे यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळं त्यांना व्यक्ती आठवत नाही. मात्र, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची असलेली राजकीय दहशत आणि दादागिरी मोडून काढत येथील जनतेच्या मनातील भीती दूर केली. म्हणूनच, आज मोकळेपणाने जनता वावरत आहे. त्यामुळं एक वेळ मला नाही ओळखलं तरी चालेल, परंतु अजित पवार कोण हेच जर ते विचारत असतील, तर त्यांनी वेळीच आपले उपचार करून घ्यावे. आज केंद्रीय मंत्रीपद मिळालं, त्याला सहा महिने झाले, परंतु कोकणासाठी एकही योजना ते आणू शकले नाहीत. मला हे पद मिळाले असते, तर आपण कोकणचा कायापालट केला असता. मी राज्यमंत्री असताना चांदा ते बांदा ही योजना आणली. परंतु, आज तुमच्याकडे केंद्रीय मंत्रीपद असताना तुम्ही एकही योजना आणू शकला नाहीत. संसदेमध्ये विचारलेला प्रश्न त्यांना समजत नाही. त्यामुळं ज्या मोदींनी (Narendra Modi) तुम्हाला हे मंत्रिपद दिलं, त्या मोदींना मोठ करायचं असेल, तर प्रश्न समजण्या इतपत अभ्यास करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.