शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र भुयार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

mla devendra bhuyar meet ncp sharad pawar amide  sanjay raut alligations after rajya sabha election 2022
mla devendra bhuyar meet ncp sharad pawar amide sanjay raut alligations after rajya sabha election 2022
Updated on

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर देखील राज्यातील राजकीय वातावरण तापलेलेच आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचं सांगत त्यांच्यावर आरोप केले होते, यानंतर नाराज झालेल्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर गैरसमज झाल्याने आरोप केल्याचं पवार म्हणाले असल्याचं भुयार यांनी सांगितले आहे. (mla devendra bhuyar meet ncp sharad pawar amide sanjay raut alligations after rajya sabha election 2022)

शरद पवारांच्या भेटीनंतर भुयार यांनी जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे भुयार म्हणाले. राज्यसभेचा उमेदवार पराभूत झाल्याचं खापर आपक्ष आमदारावर फोडण्यात आलं, मी पवारांना हा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर शरद पवार यांनी गैरसमज झाल्याने त्यांच्याकडून असे बोलले गेले. संजय राऊत यांच्याशी बोलणार असून त्यांना खुलासा करण्याच्या सूचना देणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे, असे भुयार यावेळी म्हणाले.

तसेच शिवसेनेकडून बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय का? असे विचारले असता, गैरसमजूतीमधून हा प्रकार घडला असे शरद पवारांनी मान्य केलं आणि माझंही तेच मत आहे असे भुयार म्हणाले. त्याचे संशोधन आणि बारकाईने चौकशी झाली पाहिजे, लगेच प्रतिक्रिया देऊ नये असे भुयार यावेळी म्हणाले.

दरम्यान संजय राऊत यांनी गद्दारीचा आरोप केल्यानंतर देवेंद्र भुयारांनी हे आरोप फेटाळले होते. भुयार यांनी राऊतांच्या या आरोपांना प्रत्युत्तरही दिलं होतं. आपण सातत्याने महाविकास आघाडीच्या बाजूने असूनही, त्यांना मत देऊनही आपल्याला बदनामी सोसावी लागत आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीचे कर्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं भुयार यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.