MLA Disqualification Uddhav Thackeray
MLA Disqualification Uddhav ThackerayeSakal

MLA Disqualification Uddhav Thackeray : नार्वेकरांचा निकाल विरोधात पण तरीही ठाकरेंना फायदा! उद्धव ठाकरे मॅजिक दाखवणार?

आजच्या निकालातून उद्धव ठाकरेंचा झालेला पहिला आणि स्पष्ट फायदा म्हणजे, ठाकरे गटाचे १४ आमदार देखील पात्र ठरले आहेत.
Published on

MLA Disqualification Verdict : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये उद्धव ठाकरेंना दोन मोठे धक्के बसले. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) नसून शिंदे गट (Shinde Group) असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. यासोबतच शिंदे गटाचे १६ आमदार पात्र असल्याचंही नार्वेकरांनी जाहीर केलं. हे दोन्ही मुद्दे उद्धव ठाकरेंच्या विरोधातील असले, तरी या निकालामुळे त्यांचा फायदाही होण्याची चिन्हं दिसत आहेत.

आजच्या निकालातून उद्धव ठाकरेंचा झालेला पहिला आणि स्पष्ट फायदा म्हणजे, ठाकरे गटाचे १४ आमदार (Thackeray Group MLA) देखील पात्र ठरले आहेत. शिवसेना शिंदेंची हे घोषित झाल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांवर टांगती तलवार होती. मात्र, शिंदे गटाचीही याचिका फेटाळून लावत नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र असल्याचं घोषित केलं. यामुळे उद्धव ठाकरेंचा काही अंशी विजय झाल्याचं दिसत आहे.

उद्धव ठाकरे गटातील आमदार पात्र ठरल्यामुळे आता ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयातील केस अधिक मजबूत होणार आहे. ही नक्कीच उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे.

सहानुभूतीची लाट

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आलेली दिसत आहे. बाळासाहेबांचे पुत्र असल्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडेच असावी असं मानणाऱ्यांचा एक मोठा गट आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे कायद्याने जरी शिंदे गटाची शिवसेना खरी मानली गेली असली; तरीही शिवसेना म्हटलं की ठाकरे हेच समीकरण बहुतांश जनतेच्या मनात फिक्स आहे.

MLA Disqualification Uddhav Thackeray
Eknath Shinde Won: एकनाथ शिंदे पात्र का ठरले? विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील 5 महत्त्वाचे मुद्दे

शिंदे यांचे आमदार अपात्र ठरतील असा अंदाज या निकालापूर्वी व्यक्त करण्यात येत होता. अगदी उद्धव ठाकरेंचे कित्येक राजकीय विरोधक देखील शिंदेंना विरोध करत होते. आजच्या निकालानंतर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद कायम राहिलं आहे. तसंच शिवसेना हा पक्षही त्यांच्याकडेच असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंबद्दल राज्यातील कित्येक नागरिकांना सहानुभूती निर्माण झाली आहे. या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन, पुढील निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे काही मॅजिक दाखवतात का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.