Shambhuraj Desai : 'अपात्रतेच्या सुनावणीत गडबड करू नका, शिंदे गटाच्या आमदारांना बाजू मांडण्याची संधी द्या'

आमदारांवर अपात्रतेच्या (MLA Disqualified) कारवाईत वेळकाढूपणा होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर (Assembly Speaker) सुरू आहे.

सातारा : शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत गडबड करू नये. आमदारांना आपली बाजू मांडण्यास पुरेशी संधी द्यावी. दोषी असले तर कारवाई करावी; पण आमचे आमदार दोषी नाहीत. त्यामुळे या प्रकरणात वेळकाढूपणा करण्याचा संबंधच नाही, असे स्पष्ट मत पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले.

Shambhuraj Desai
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल कोणी घडवली, खरे मास्टरमाईंड कोण? 'या' सहा जणांची नाव घेत पावसकरांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गट शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या (MLA Disqualified) कारवाईत वेळकाढूपणा होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.

देसाई म्हणाले, ‘‘आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर (Assembly Speaker) सुरू आहे. हासुद्धा न्यायालयीन प्रक्रियेचाच एक भाग आहे. आमच्या आमदारांनी म्हणणे मांडलेले आहे. सुनावणीस आमदार प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. आम्ही तीन ते चार लाख लोकांतून निवडून आलेलो आहोत. एका सुनावणीत व तारखेत पुरेसे म्हणणे न ऐकता निर्णय झाला आणि तो आमच्या विरोधात गेला, तर आम्हाला आमचे म्हणणे पूर्णपणे व व्यवस्थित मांडायला दिले पाहिजे.

Shambhuraj Desai
Raju Shetti : 'शरद पवारांच्या पाठीत खंजिर खुपसला, तसंच धनंजय मुंडे एक दिवस अजितदादांच्या पाठीत खंजिर खुपसतील'

आमदारांनी यापूर्वी लेखी म्हणणे मांडले आहे. आणखी काही न्याय दाखले, निवाडे, जुने संदर्भ द्यायचे आहेत. त्यामुळे या सुनावणीत गडबड करू नये. आम्हाला पुरेशी संधी द्यावी. आम्ही दोषी असलो, तर कारवाई करावी; पण आम्ही दोषी नाही, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात वेळकाढूपणा करण्याचा संबंधच नाही.’’

Shambhuraj Desai
BJP-JDS Alliance : 'मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, लोकसभेसाठी भाजप-धजद युती अंतिम टप्प्यात'; ज्येष्ठ नेते येडियुराप्पांची माहिती

जरांगे पाटलांचे मानले आभार...

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास दाखवला असून, एकनाथ शिंदेच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार असल्याचे कौतुक जरांगे पाटील यांनी केले आहे. यावर देसाई म्हणाले, ‘‘जरांगे पाटील यांनाही आता खात्री झाली आहे. धाडसाने निर्णय घेणारा मुख्यमंत्री शिंदे यांच्या रूपाने मिळाला आहे. टिकणारे आरक्षण तेच देतील, असा विश्‍वास त्यांनी काही लाखांच्या समोर व्यक्त केला आहे. त्यामुळे आम्ही जरांगे पाटलांचे आभार मानतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.