कऱ्हाड (सातारा) : बैलगाडी शर्यतीप्रश्नी (Bullock cart race) उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही. त्यांनी बैलगाडी शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणे आहेत. बैलगाडी शर्यतीबाबत अनेकदा वेगवेगळी विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी लगावला.
बैलगाडी शर्यतीप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही.
गोवारे (ता. कऱ्हाड) येथे गोपीचंद पडळकर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार पडळकर म्हणाले, ‘‘बैलगाडी शर्यत सुरू करणे हा राजकारणाचा मुद्दा नाही. मात्र, शर्यत सुरू करणे हा स्टंट नाही. झरे गावातील बैलगाडी शर्यतीसाठी हजार पोलिस झरेसारख्या गावात येतात म्हणजे सरकारला हे आंदोलन मोडून काढायचे होते. खासदार, आमदारांच्या दारात जाऊन बैलगाडी मालक दोन वर्षांपासून निवेदन देत आहेत. मग तुम्ही दोन वर्षांत न्यायालयात याप्रश्नी सरकार म्हणून का गेला नाही.
मराठा आरक्षणाची तारीख झाली तेव्हा चालढकलपणा केला. त्यांनीच वकील नेमला होता. त्या वेळी सरकार आमच्याकडे कागदपत्रे देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाही, असे अजित पवार सांगतात. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत पंधरा महिन्यांत आठ तारखा पडल्या; पण तुम्ही एकदाही सरकारने म्हणणे मांडले नाही अन् बैलगाड्यांच्या बाबतीत तारीखच पडली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.