Dhangar Reservation : ..तर महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखं धनगर समाजाचं आंदोलन उभा होईल; पडळकरांचा सरकारलाच इशारा

प्रचंड दिरंगाईमुळे समाजाच्या भावनांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो.
MLA Gopichand Padalkar
MLA Gopichand Padalkaresakal
Updated on
Summary

‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या १००० कोटींच्या २२ योजनांपैकी अनेक योजनांची कसलीही अंमलबजावणी सुरू नाही. शिवाय घोषित केलेला निधीही मिळालेला नाही.

आटपाडी : धनगर समाज आरक्षण (Dhangar Reservation) आणि त्यांच्या योजनेसंदर्भातील प्रश्न संवादाने सुटतील, ही आमची अपेक्षा आहे; मात्र प्रचंड दिरंगाईमुळे समाजाच्या भावनांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी; अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखे (Jat Agitation) धनगर समाजाचे आंदोलन उभा होईल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

MLA Gopichand Padalkar
Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची न्यायालयातील याचिकेत ॲड. कुंभकोणी यांची पुन्हा नियुक्ती कायम करून न्यायालयातील सुनावणी रोज सुरू करण्यासाठी अर्ज करण्याची विनंती केली आहे.

MLA Gopichand Padalkar
Maratha Reservation : घटनादुरुस्तीशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे तितकंच खरं; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

तसेच मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाची घोषणा करून योजना जाहीर केल्या जाव्यात आणि महामंडळाच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या १००० कोटींच्या २२ योजनांपैकी अनेक योजनांची कसलीही अंमलबजावणी सुरू नाही. शिवाय घोषित केलेला निधीही मिळालेला नाही. त्यासाठी तत्काळ बैठक घेऊन आढावा घेण्याची मागणी केली आहे.

MLA Gopichand Padalkar
Women's Reservation Bill : नव्या विधेयकात भाजपनं अशी पाचर मारून ठेवली की..; वर्षा गायकवाडांचा मोदी सरकारवर निशाणा

मेंढपाळांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा आणला जावा आणि चराई कुरण नाममात्र हेक्‍टरी एक रुपयाप्रमाणे आकारणी करून मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी देण्याची अंमलबजावणी केली जावी. आरेवाडीतील बिरोबा मंदिराचा विकास आणि भाविकांना सेवा-सुविधा देण्यासाठी तत्काळ २०० कोटींची घोषणा केली जावी.

MLA Gopichand Padalkar
संतापजनक! पोलिसानं स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं; क्षणात चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी अंत, असं काय घडलं?

महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ला वाफगावच्या विकास संवर्धनासाठी किल्ला ताब्यात घेऊन आराखडा तयार करून तत्काळ अंमलबजावणी केली जावी. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण केले, तसेच नगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामकरण करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.