BJP : 'आता भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही'; आमदार गोरेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळं देशात आमूलाग्र बदल होऊन अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
Jayakumar Gore
Jayakumar Goreesakal
Updated on
Summary

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळं देशात आमूलाग्र बदल होऊन अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

बिजवडी (सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकारमुळं देशात आमूलाग्र बदल होऊन अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र, काँग्रेससह (Congress) राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती (Baramati) आणि फलटणकरांची घराणेशाही एकदम ओकेच असल्याचा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी लगावला.

Jayakumar Gore
UP : मुस्लिम आरोपींना भरचौकात अर्ध्यावर गाडून दगडांनी मारून टाका; सपा खासदाराचं वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची सुरुवात करताना ते फलटण तालुक्यातील विविध गणांमधील मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar), भाजपचे संघटक सरचिटणीस शेखर वडणे, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, विश्वासराव भोसले, पिंटू हिवरे, तसेच तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपवर जनतेचा मोठा विश्वास

आमदार गोरे म्हणाले, ‘‘देश आणि राज्य प्रगतिपथावर नेणाऱ्या भाजपवर जनतेचा मोठा विश्वास आहे. विरोधी पक्षांमधील अनेक जण भाजपचे कमळ हाती घेत आहेत. आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे. सगळीकडे एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पदे भूषवीत आहेत. रामराजेंची घराणेशाही तालुक्यात सुरू असल्याने कुवत असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर कित्येक वर्षे अन्याय होत आहे. त्यांनी सामान्य माणसाला कधी संधीच दिली नाही. इथल्या जनतेला आता आरपारची लढाई लढून तालुक्यात आमदारकीपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिकेतही बदल करायची वेळ आली आहे.’’

Jayakumar Gore
Chandigarh : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलं 'सत्य'

'त्यांच्या दारात हांजी हांजी करायला गेले पाहिजे'

माणच्या स्वाभिमानी जनतेने १३ वर्षांपूर्वी बदल करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले. आज तालुक्याचे आणि मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. गावागावांत कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. विविध योजनांचे पाणी पोचले आहे. सर्वत्र उसाची बागायती शेती पिकू लागली आहे. चार साखर कारखाने सुरू आहेत. मात्र, फलटण तालुक्यातील रामराजेंची अनेक वर्षे सत्तेत राहून मंत्रिपदे भोगून काहीच केले नाही, हे दुर्दैव आहे. लोकांनी त्यांच्यावर अवलंबून राहून त्यांच्या दारात हांजी हांजी करायला गेले पाहिजे, अशी त्यांची वृत्ती असल्याने घराणेशाही बोकाळली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये फलटण तालुक्यातील जनतेने सर्वसामान्यांची आणि भाजपची ताकद दाखवत सामान्य माणसांचे राज्य आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Jayakumar Gore
Elizabeth II : महाराणीच्या अंत्यसंस्काराला जगभरातील 'हे' बलाढ्य नेते राहणार उपस्थित, पहा यादी

'येणाऱ्या काळात त्यांना जशास तसे उत्तर देऊ'

खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असल्याने आम्ही विकासकामांत कुठेच कमी पडणार नाही. केंद्राच्या जलजीवन, आयुष्यमान अशा अनेक योजना जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल करत आहेत. आम्ही केंद्राच्या माताभगिनींसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देत आहोत. फलटण तालुक्यात एमआयडीसी, रेल्वे, फोरलेन रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. ज्यांनी आजपर्यंत तालुक्याला लुटले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही वज्रमूठ बांधली आहे. येणाऱ्या काळात त्यांना जशास तसे उत्तर देऊ.’’

Jayakumar Gore
अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच 7 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न? विद्यापीठाकडून मोठा खुलासा

मेळाव्यांना मोठा प्रतिसाद

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा मेळाव्यांना फलटण तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी भाजपच्या माध्यमातून देशात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे बारकाईने अवलोकन केले. मोदी आणि केंद्र सरकारवर जनतेने विश्वास दाखविल्याने देशाची झालेली प्रगती चित्ररथ आणि व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.