Ajit Pawar: शरद पवारांना मोठा झटका! फसवून सही घेतली म्हणणारे आमदार पुन्हा अजित पवारांच्या गोटात दाखल

फसवून सही घेतली म्हणणारे आमदार पुन्हा अजित पवारांच्या गोटात दाखल
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील एका आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर पुन्हा गाठीभेटी सुरू झाल्या. (Latest Marathi News)

आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार पक्षाची बैठक बोलावली होती त्या बैठकीत किरण लहामाटे हे उपस्थित होते. आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता आले आहेत.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Mantralaya Cabin : देवेंद्र फडणवीसांनी नाकारलेलं केबिन नं. ६०२ शापित केबिन अजित पवारांच्या गळ्यात बांधण्याचा डाव?

अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी डॉ. लहामटे अजित पवार यांच्यासोबत होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर त्यांनी सह्या देखील केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी लहामटे शरद पवार यांच्याकडे परतले. मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली त्यामुळे पुन्हा ते कोणाला पाठिंबा देणार याबाबत याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे त्यांनी म्हंटलं होतं. तेव्हापासून लहामटे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Shivsena MLA: राज्यपालांनी हिरवा कंदील दाखवलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार? आज न्यायालयात सुनावणी

अजित पवार यांनी लहामटे यांना परत आणण्याची जबाबदारी नगरचे विळद येथील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप यांना देण्यात आली होती. जगताप यांनी डॉ. लहामटे यांची समजूत काढली. मात्र, ते सहजासहजी तयार होत नव्हते. विविध माध्यमांतून लहामटे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र लहामटे त्यांना टाळत होते. त्यानंतर आज लहामाटे अजित पवार यांच्या भेटीला आले आहेत.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Maharashtra Politics: रात्रीस बैठका चाले! वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत तीन नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदे आज करणार मोठी घोषणा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.