'रयत'मध्ये महिन्याला 25 कोटींचा भ्रष्टाचार; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on
Summary

'जरंडेश्वर कारखाना आमच्या रक्ताच्या पैशातून उभा राहिलेला आहे.'

विसापूर (सातारा) : रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) सर्व इमारतींच्या पेंटिंग व फर्निचरची कामे बारामतीच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात. रयतमध्ये प्रतिमहिन्याला सरासरी २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केला. कटगुण (ता. खटाव) येथे कटगुण, काटकरवाडी, शिंदेवाडी, धावडदारे येथील एक कोटी ८४ लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, कटगुणच्या सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, प्रकाश जाधव, नितीन पाटील, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘ज्या कुटुंबातील लोकांनी रयत शिक्षण संस्थेत योगदान दिले, ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना संस्थेतून काढू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही मागणी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या पोटात दुखायच कारण काय? रयत ही महाराष्ट्राची संस्था आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला ही माझी चूक आहे.’’ माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना गुणवत्तेवर रयतमध्ये नोकरी द्यावी, ही माझी मागणी चुकीची आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Sharad Pawar
शरद पवार उंचीने नव्हे तर कर्तृत्वाने ओळखले जातात - जितेंद्र आव्हाड

ते म्हणाले, ‘‘आज जिल्ह्याच्या हक्काच्या संस्था चालवतंय कोण? या प्रश्नाने जनता उद्विग्न झाली आहे. जरंडेश्वर साखर कारखानाही (Jarandeshwar Sugar Factory) कालही आमचा मालकीचा होता. आजही आमचा आहे आणि उद्याही आमच्याच मालकीचा राहणार आहे. त्यामुळे आमचा आवाज कितीही दाबला तरी त्याचा फायदा होणार नाही. कारण जरंडेश्वर कारखाना आमच्या रक्ताच्या पैशातून उभा राहिलेला आहे. आम्ही ते विसरणार नाही. ज्या संचालकांनी स्वतःच्या घरावर कर्ज काढले त्या संचालकांचा ऊस राजकारण करून तोडला जात नाही. ही भूमिका चुकीची असून, या भूमिकेच्या विरोधात मी आवाज उठवत आहे. यासाठी तुम्ही सहकार्य करा.’’ जयश्री गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. हणमंत गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.