'परबांनी आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर..'; नितेश राणेंचा टोला

मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayTeam eSakal
Updated on

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री (Transport minister) आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil parab) आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीने त्यांना दुसरं समन्स बजावल्यानंतर अनिल परब हजर राहिले. चौकशीला निघत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "मला ईडीचं (ED) दुसर समन्स (Summons) मिळालं आहे. मी आता चौकशीला जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की, मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही" असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब यांच्या या विधानावर कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना टोला लगावला आहे. नितेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत. "स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांपेक्षा, आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता" असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

CM Uddhav Thackeray
आठवीच्या पाठ्यपुस्तकात रॉकेट लाँचर आणि कुराण घेतलेला दहशतवादी?

मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येईल, अशी चर्चा होती.

CM Uddhav Thackeray
उरीमध्ये इंडियन आर्मीने पकडला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी

नेमक काय म्हणाले अनिल परब

"ईडीने नेमकी कशासाठी नोटीस बजावलीय, ते आपल्याला माहित नाही" असे अनिल परब यांनी सांगितले. "मी चौकशीला पूर्ण सहकार्य करीन. मला का बोलावलय ते अजूनही माहित नाही. मी चौकशीला तिथे गेल्यानंतरच समजेल. आज चौकशीला बोलावलं आहे. माझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाही" असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()