Shinde Vs Thackeray : "...त्यांच्या मानसिकतेची कीव येते"; अपात्रतेच्या सुनावणीदरम्यान अपक्ष आमदाराची ठाकरे गटावर टीका

Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal
Updated on

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले, या दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबतची सुनावणी आजपासून सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होत असलेल्या सुनावणी दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे ४० आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या 14 आमदारांची सुनावणी पार पडणार आहे. यावेळी शिंदे गटाला पाठिंबा असलेले अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांची देखील सुनावणी पार पडणार आहे. (shiv sena mlas disqualification case)

तरी देखील मला नोटीस...

शिंदे गटाला पाठिंबा देत सत्तेत सहभागी असलेले अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील सुनावणीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याबद्दल बोलताना त्यांनी माहिती दिली की, अपक्ष आमदारांना कुठलाही व्हीप लागू होतं नाही, पक्षांतरबंदीचा विषय नसतो. कारण आम्ही कोणत्या पक्षांच्या चिन्हावर निवडून आलो नाही. तरी देखील सुनिल प्रभू यांनी शेड्यूल १० प्रमाणे कारवाई करण्याची नोटीस दिली आहे.

भोंडेकर पुढे बोलताना म्हणाले की, मला त्यांच्या मानसिकतेची कीव येते. त्यांचं जे काही आपसीय होतं तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण अपक्षांना अशी नोटीस देणं न शोभणारा विषय आहे, असे भोंडे म्हणाले. शेड्यूल १० प्रमाणे अपक्षांना व्हीप लागू होत नाही, असं उत्तर आम्ही विधानसभा अध्यक्षांना देणार असेही त्यांनी सांगितले. ते टीव्ही९ शी बोलत होते.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Anantnag Encounter: "PM मोदींवर भाजप कार्यकर्ते फुलं उधळत होते अन् काश्मीरमध्ये..."; राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अपक्ष असून शिंदे गटाला पाठिंबा दिलेले भोंडे पुढे म्हणाले की, मुळात प्रश्न पक्षाचा आहे आणि पक्षाला मान्यता आहे शिंदे गटाला, पक्ष बदलला तर पक्षांतरबंदीचा कायदा लागू होतो. पण पक्षच त्यांच्याकडे असल्याने पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच सर्व अपक्षांनी पूर्वीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे आणि आताही दिला आहे असेही भोंडेकर म्हणाले.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Colonel Manpreet Singh : दोन चिमुकल्यांना मागे सोडून देशासाठी शहीद; कोण होते कर्नल मनप्रीस सिंह?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.