NCP Political Crisis: आधी अजित पवारांना समर्थन नंतर पवार गटात अन् आता वळसे पाटलांच्या गाडीत? आणखी एक नेता गट बदलणार?

सुरुवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं त्यानंतर शरद पवार गटात गेले आता वळसेंच्या गाडीत दिसल्याने चर्चेला उधाण
NCP Political Crisis
NCP Political CrisisEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अजित पवारांसह ९ नेत्यांनी भाजप-शिवसेना यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले. अजित पवार गटाने पक्ष नाव आणि चिन्हावर दावा सांगितला. तर पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी अजित पवारांना समर्थन दिलं. काही नेते आधी अजित पवारांसोबत गेले, आणि नंतर शरद पवारांकडे परत आले, त्यातीलच एक नेते हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पहायला मिळाले.

हवेलीचे शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार हे आज अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीत दिसले. त्यामुळे ते अजित पवार गटात जाणार का याबाबतची चर्चा रंगली आहे. दरम्यान सुरुवातीला अशोक पवारांनी अजित पवारांना समर्थन दिलं होतं. नंतर ते शरद पवार गटात गेले. मात्र, ते आज दिलीप वळसेंच्या गाडीत दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

आज सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक बापू पवार दिलीप वळसे पाटलांच्या गाडीत दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटातून परत आलेले अशोक बापू पवार हे पुन्हा अजित पवार गटात जाणार का अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

NCP Political Crisis
Sharad Pawar: अंतिम शब्द साहेबांचाच! पवारांसोबतच्या भेटीनंतर वळसे पाटलांनी सांगितलं कशावर झाली चर्चा?

वळसे पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे दाखल झाले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात आहेत. सध्या ते सरकारमध्ये सहकारमंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणुन दिलीप वळसे पाटील यांची राजकारणात ओळख आहे. दिवाळी निमीत्त शुभेच्छा देण्यासाठी ते शरद पवारांना भेटले.

NCP Political Crisis
Sharad Pawar: मोदीबागेत जुने सहकारी आले भेटीला! वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीच कारण आलं समोर

भेटीनंतर वळसे पाटलांनी सांगितलं कशावर झाली चर्चा?

वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही, ही पुर्वनियोजित भेट होती अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ही भेट पुर्वनियोजित होती. रयत शिक्षण संस्थेचे अनेक पदाधिकारी देखील होते. रयत शिक्षण संस्थेच्या निमीत्ताने भेट झाली आहे, या भेटीमागे वेगळं कारण नाही.

या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचं काहीचं कारण नाही. मी अनेक संस्थांमध्ये काम करत आहे, त्या संस्थांच्या कामासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतो. सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून काही निर्णय घेण्यात आले आहेत ते शरद पवार यांच्या कानावर घातले आहेत, असंही दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

NCP Political Crisis
हृदयद्रावक! 10 महिन्यांच्या चिमुरडीला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी 'आजोबा'कडून नातीला यकृत दान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.