अन् रोहित पवार, डॉ. विश्वजित कदम गेले खेळण्यांच्या दुकानात!

rohit-pa.jpg
rohit-pa.jpg
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता. आता या सत्तासंघर्षाला पुर्णविराम मिळाला असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. सत्तासंघर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांनी कोणताही आमदार फुटू नये यासाठी विशेष काळजी घेतली होती. मागील महिनाभर या आमदारांचा मुक्काम वेगवेगळ्या हॉटेलमध्ये होता. शनिवारी विधानसभेत उद्धव ठाकरे सरकारने बहुमत चाचणीत यशस्वी झाले तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकही बिनविरोध झाली. त्यामुळे सत्ताधारी आमदारांचा हॉटेल मुक्काम संपला आहे. त्यामुळे या आमदारांना कुटुंबाची तसेच मतदारसंघाची ओढ लागली आहे.

रविवारी विशेष अधिवेशन संपल्यानंतर अनेक तरुण आमदार आपापल्या घराकडे निघाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि काँग्रेसचे विश्वजित कदम एकत्र पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान घडलेला किस्सा रोहित पवारांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मिडीयात मोठी चर्चा होत आहे.  

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं. परवा दिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता.

कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते.

दरम्यान, राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल. हीच पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.