आमदार प्रणिती शिंदेंचा अधिवेशनात घुमला आवाज! मंत्र्यांनी सांगूनही सोलापूरची विमानसेवा सुरू झाली का? सोलापूर शहर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातील प्रश्नांची दखल

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदेंनी बुधवारी विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत जोरदार बॅटींग केली. सोलापूर जिल्ह्यातील त्या एकमेव विरोधी आमदार आहेत.
mla praniti shinde
mla praniti shindesakal
Updated on

सोलापूर : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदेंनी बुधवारी विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत जोरदार बॅटींग केली. सोलापूर जिल्ह्यातील त्या एकमेव विरोधी आमदार आहेत.

अर्थसंकल्पावर चर्चा करताना आमदार प्रणितींनी सोलापूर महापालिकेंतर्गत पंप ऑपरेटर व मजूर विविध पंप हाऊसवर काम करीत आहेत. पण, ठेकेदार कामगारांच्या पगारात कपात करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून पगार मिळावा व ठेकेदारांचा मक्ता रद्द करावा. तसेच मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मंगळवेढ्याचा आमदार भाजपचा करा, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजूरी आणि केंद्रातून पैसे उपलब्ध करतो’ असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. सोलापुरात अधिकाऱ्यांचा मनमानी सुरू आहे. नियोजनाअभावी शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, असे मुद्दे मांडले.

भाषणातील ठळक मुद्दे...

  • सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन व एमआरआय मशीन द्या

  • जिल्हा रुग्णालय सुरू करण्याची घाई सध्या सुरू असून पात्रता नसलेले कर्मचारी घेतले जात असल्याचा आरोप.

  • मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे सोलापूर-सांगली महामार्गावर आजूबाजूच्या गावांसाठी सर्व्हीस रोड जुन्या रस्त्याला जोडलेला नसल्यामुळे अपघातात वाढ

  • अक्कलकोटमधील ब्यागेहळ्ळी, कोन्हाळी, हसापूर, दहिटणे या गावाच्या कार्यक्षेत्रात नवीन सोलार प्रोजेक्ट होत असून शेतकऱ्यांना प्रतिएकरी वार्षिक भाडे ५० हजार मिळणे अपेक्षित असतानाही केवळ ३० हजार रुपयेच दिले आहेत.

  • लोधी, मोची, मातंग समाजासाठी महामंडळांची गरज

सोलापूरची विमानसेवा सुरू झाली का?

सोलापुरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यावर सहा महिन्यांत विमानसेवा सुरू होणार होती, तसे दोन मंत्री सांगत होते. पण, अजूनही विमानसेवा सुरू झाली नाही. बोरामणी विमानतळासाठी निधी मिळणार होता, तोही मिळाला नाही, असे मुद्दे आमदार प्रणिती शिंदेंनी मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.