महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार (BJP MLA) प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या निवास्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे. रविवारी पहाटे हा प्रकार घडला असून या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवांच्या मूर्ती हा ऐवज होता. रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने घराच्या बाहेर बॅग ठेवली होती. मात्र, ही व्यक्ती कोण आहे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही.
काय म्हणाले लाड?
या घटनेबाबत लाड यांनी सांगितले की, 'पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला एक बॅग पडली आहे. मी पाहिलं त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅगा होत्या. पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस पथक आले. सोनं, चांदी, पैसे, मूर्ती हा ऐवज होता. माझ्या घराबाहेर 24 तास पोलिस संरक्षण असतं. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसला होता. त्यांनी त्याला हटकलं असता त्यानं ती बॅग टाकून पळ काढला.
या प्रकराची घटना माझ्या घराबाहेर दुसऱ्यांदा घडली आहे. संरक्षण असताना या प्रकराची घटना घडणे योग्य नाही. बॅगेत ऐवज सापडला. त्यामध्ये दुसरं काही असतं तर घातपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्रीचं गस्तीपथ वाढवावं, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.'
प्रसाद लाड हे काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मुंबई भाजपामधील प्रमुख नेते असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. ATM दुरुस्तीच्या नावाने आले अन् 22 लाख लुटून नेले! जीवे मारण्याची धमकी लाड यांना काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली होती. या प्रकारानंतर त्यांनी संरक्षण वाढवण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झालेल्या चुरशीच्या विधानपरिषद निवडणुकीत प्रसाद लाड हे भाजपकडून निवडून आले होते. प्रसाद लाड हे भाजपचा पाचवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. भाजपकडे पुरेशी मतं नसतानाही प्रसाद लाड यांनी विजयी होण्याची किमया करून दाखवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.