..तर भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
Prithviraj Chavanesakal
Updated on
Summary

राज्यात भाजप सत्तेत असताना त्यांच्याकडून विरोधी पक्षाला संपवून टाकण्याचं काम झालं; पण..

कऱ्हाड (सातारा) : राज्यात भाजप (BJP) सत्तेत असताना त्यांच्याकडून विरोधी पक्षाला संपवून टाकण्याचे काम झाले. मात्र, भाजपला दूर ठेवून राज्यात अस्तित्वात आलेलं महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) हे सध्याची टर्म पूर्ण करुन त्याही पुढचे पाच वर्षे सरकार टिकेल. यापुढच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाल्यास भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी येथे व्यक्त केला.

कॉंग्रेसच्या (Congress) ओबीसी मेळाव्यात आमदार चव्हाण बोलत होते. मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), कॉंगेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा निलम येडगे आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण पुढं म्हणाले, केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना ओबीसीसाठी केंद्रीय मंत्रालयात एक स्वतंत्र विभाग होता. ओबीसींची लक्षात आल्यावर महराष्ट्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. कॉंग्रेसने १९९४ साली ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांत २७ टक्के राजकीय आरक्षण दिले. मात्र, आज काही तांत्रिक कारणामुळे २७ टक्के आरक्षण संपुष्टात आले आहे.

Prithviraj Chavan
'महाराष्ट्राला दृष्ट लावण्याचं काम काही भोंगेबाज करताहेत'

महात्मा फुलेंच्या कटगुणला होणाऱ्या स्मारकाच्या विकासासाठी मी पाठपुरावा करणार आहे. भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) घटना मान्य नाहीय. त्यांना वर्णाश्रमावर आधारीत व्यवस्था निर्माण करायची आहे. देशाची अर्थव्यवस्था टोकाच्या संकटावर आहे. देशाची श्रीलंकेसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही. देशात कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या डोससाठी पैसे घेतले जात आहेत. जगात कोणत्याही देशात पैसे घेतले जात नाहीयत. केंद्राची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे केंद्राने कराचा बोजा जनतेवर लादला आहे. त्यातून लाखो कोटी रुपये जमा केले आहेत. देशात कॉंग्रेसने समानतेचे वातावरण निर्माण केले. सध्या देशातील स्थिती पाहिल्यास लोकशाही टिकवण्याचे आव्हान जनतेसमोर आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()