Raju Patil Mns : टोलनाका तोडफोड प्रकरणावरुन भाजप व मनसे यांच्यात सोशल वॉर सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर हे राजकारण तापले असताना स्थानिक पातळीवर मात्र भाजपा मनसे यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
14 गाव सर्व पक्षिय विकास समितीच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले असून सध्या सोशल मिडीयावर या बॅनरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 14 गावांच्या विकासासाठी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निधी दिला. त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील व विकास समिती सातत्याने पाठपुरावा करत होती. त्या कामास यश आल्याने हे फलक लावल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर विकासासाठी भाजप मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी टोल नाक्यावर अडवली गेली. या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाकाच फोडला. या तोडफोडीचे पडसाद थेट मंत्रालयात उमटले. या प्रकरणावरुन भाजपा नेत्यांनी मनसेला टार्गेट करण्यास सुरुवात केली. भाजप आणि मनसेत सोशल मिडीयावॉर सुरु झाले.
कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील या तोडफोडीवरुन भाजपला जोरदार टोला लगावला होता. वरिष्ठ स्तरावर ही सारी राजकीय कालवा कालव सुरु असतानाच स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि मनसेत युती असल्याचा प्रत्यय आला आहे. नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावांचा समावेश पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेत केला जाणार आहे.
याविषयीच्या काही बाबींची पूर्तता न झाल्याने व अद्याप हा प्रश्न निकाली लागलेला नाही. गावांचा समावेश पालिकेत अद्याप केला न गेल्याने या गावाचा विकास रखडला आहे. या गावांच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती सातत्याने पाठपुरावा करत होती.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निधी विषयी पाठपुरावा केला जात होता. भाजपचे मंत्री चव्हाण यांनी गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यांचे आभार मानणारे बॅनर गावांत सगळीकडे झळकले आहेत.
या बॅनरवर कल्याण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, चिटणीस गुरुनाथ पाटील यांच्या मागणीने आणि आमदार राजु पाटील साहेब यांच्या प्रवयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभामार्फत 14 गावातील रस्त्यांना 32 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात आले आहेत.या बॅनरची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवर भाजपा मनसे युती असून विकास कामांसाठी एकत्र येणार याचा प्रत्यय आल्याचे बोलले जात असून हा बॅनर समाज माध्यमावर व्हायरल केला जात आहे.
याआधी ही भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांचे बॅनर सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. या बॅनरमध्ये त्यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात भोपर-देसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांचे या बॅनरमधून आभार मानण्यात आले होते. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानत ट्विट सुद्धा केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.