न्यायालय आमदार रवी राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी केली आहे.
अमरावती : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेकप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामीनावरील सुनावणी शुक्रवारी (ता. ४) सकाळी अकराच्या सुमारास होणार आहे. जिल्हा न्यायालय (क्रं.५) एस. बी. जोशी यांच्या न्यायालयात आमदार रवी राणा यांचे वकील अॅड. दीप मिश्रा व अॅड. प्रशांत देशपांडे यांनी बुधवारी (ता. २) अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावर न्यायालयात (Court) सुनावणीही झाली. परंतु सरकारी वकील व राजापेठ पोलिस यांना से दाखल करण्यासाठी न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. ३) वेळ दिली होती.
पोलिसांतर्फे सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी तर, सरकारी वकील अॅड. सुनील देशमुख यांनी से न्यायालयात दाखल केले. सरकारी वकिलांनी या प्रकरणावरील सुनावणी शुक्रवारी (ता. ४) करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीश जोशी यांनी शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी घेण्याचे ठरवले. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. मिश्रा व अॅड. देशपांडे उपस्थित होते. सुनावणी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पहिल्याच सत्रात घेण्याचे ठरले.
९ फेब्रुवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलाखाली पाहणीकरीता आलेल्या अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर महिलांसह काही पदाधिकाऱ्यांनी शाई फेकुन त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यानंतर आमदार रवी राणांसह एकूण ११ जणांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याप्रकरणात आतापर्यंत अटकेतील एकूण पाच जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.