आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना १५०० प्रतिमहिना थेट खात्यात दिले जाणार आहेत. या योजनेला राज्यातील महिलांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान या योजनेवरुन आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य वक्तव्य केलं आहे.