संतोष बांगरांनंतर शिंदे गटातील आणखी एका बंडखोराला शिवसेनेचा दणका

महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आमदारांनी बंडखोरी केलीय.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde News, Shivsena political Crisis News, Santosh Bangar News
Uddhav Thackeray vs Eknath Shinde News, Shivsena political Crisis News, Santosh Bangar Newsesakal
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. काही अपक्षांच्या मदतीनं त्यांनी विधिमंडळातील शिवसेनेत (Shivsena) फूटही पाडली. सध्या शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांविरूद्ध अपात्रतेची कारवाई न्यायप्रविष्ट असताना पक्षात मात्र त्यांच्याविरूद्धच्या कारवाईला सुरूवात झालीय.(Shivsena political Crisis News)

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून दररोज एक-एक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली जात आहे. यामध्ये मंगळवारी आणखी एका बंडखोराची भर पडली. शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय.(Santosh Bangar News in Marathi)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde News, Shivsena political Crisis News, Santosh Bangar News
VIDEO : दाजींचा नादच खुळा; दमलेल्या वारकऱ्यांसाठी दानवेंनी स्वत: बनवला चहा

त्यांच्यासोबत पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचीही उचलबांगडी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर ते सूरतमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी करण्यासाठी सूरतमधील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवलं होतं. त्यावेळी रवींद्र फाटक यांनीच एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रवींद्र फाटक हेच शिंदे गटात सामील झाले होते. रवींद्र फाटक हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde News, Shivsena political Crisis News, Santosh Bangar News
अशोक स्तंभाचं बांधकाम करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी विचारले 'हे' 5 मजेशीर प्रश्न

संतोष बांगर यांचीही जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना मोठा धक्का दिलाय. संतोष बांगर यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाविरोधात कार्यवाही केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.