Santosh Bangar : मंत्रीमंडळ विस्तारावेळी मी 100 टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार; संतोष बांगरांचा कॉन्फिडन्स

शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
Santosh Bangar
Santosh Bangar Sakal
Updated on

Maharashtra POlitics News : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला असून यामध्ये शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या नेत्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद मिळाले नाही त्यापैकी अनेकजण दुसऱ्या टप्प्यात तरी आपल्याला मंत्रीपद मिळणार का याकडे डोळे लावून बसले आहेत.

त्यातच ठाकरे गटाला अगदी शेवटच्या क्षणाला सोडून शिंदे यांना सामील झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात आपण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सभेत सांगितलं आहे. "शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे त्यामुळे आपण यावेळी १०० टक्के मंत्री होणार" असं ते म्हणाले. त्यामुळे सध्या चर्चा सुरू झाल्या असून खरोखर बांगर यांना मंत्रीपद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Santosh Bangar
Modi In America : मुसळधार पावसात राखला राष्ट्रगीताचा मान! पंतप्रधान मोदी भिजले पावसात; Video Viral

आमदार बांगर आपल्या वक्तव्यावरून नेहमी चर्चेत

एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेशी बंड करून गुवाहटीला गेले होते त्यावेळी शिंदे गटावर सडकून टीका करणारे संतोष बांगर पुढे होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्या रांगेत जाऊन बसले आणि बहुमतासाठी शिंदे यांच्याकडून मत दिले त्यामुळे ते पुढे अनेक दिवस चर्चेत राहिले.

मध्यंतरी त्यांनी एका कार्यकर्त्याला आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. याची ऑडिओ क्लीपसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर भाजपकडून नाराज असलेल्या शिंदे गटातील व्यक्तींच्या यादीमध्ये संतोष बांगर यांचासुद्धा सामावेश असल्याचं बोललं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.