Attack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी या हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघचे आमदार संतोष बांगर म्हणाले की, माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. काही कार्यकर्ते गाडीसमोर आले आणि त्यांनी नारेबाजी केली. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवलं असतं की संतोष बांगर काय आहे, अशा कडक शब्दात संतोष बांगर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत पत्नी आणि बहिण असल्याने मला गाडीच्या खाली उतरता आलं नाही. नाहीतरी त्यांना पळता भुई कमी पडली असती. शिवसेनेच्या स्टाइलने त्यांना खेदू-खेदू मारलं असतं असे बांगर म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे शिवसैनिकांनी (Shiv Sena) हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे गटाचे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे संतोष बांगर गेले होते, यावेळी हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.तसेच ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.