Sunil Shelake On Sharad Pawar : पुरावे दिले नाहीत तर....; सुनिल शेळके यांचं शरद पवारांना इशारा

Sunil Shelake On Sharad Pawar Latest News : लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना धमकवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यावर शरद पवारांनी सडकून टीका केली होती.
Sunil Shelke On Sharad Pawar Latest Politics News
Sunil Shelke On Sharad Pawar Latest Politics News
Updated on

Sunil Shelke On Sharad Pawar Latest Politics News : लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना धमकवल्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यावर शरद पवारांनी सडकून टीका केली होती. पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला...अशा शब्दात शरद पवारांनी दम दिल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

पुढील आठ दिवसात मी दम दिलेला एकतरी व्यक्ती समोर आणा, पुरावे दिले नाहीत तर शरद पवारांनी खोटे आरोप केले असं राज्यभर सांगणार असा इशारा आमदार सुनिल शेळके यांनी शरद पवारांना दिला.

शेळके म्हणाले की, आज मावळ येथे पवार साहेबांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती. याच्या आयोजकांनी मागच्या आठ दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते अजित पवारांची साथ सोडून पवार साहेबांसोबत यायला तयार आहेत, आपल्या हस्ते अनेकांन पक्ष प्रवेळ करायचा आहे असं खोटं सांगून पवार साहेबांना मावळ येथे निमंत्रित केलं. कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ३५ ते ४० कार्यकर्तेच उपस्थित होते. सभागृहात मित्र पक्षांचे १५० ते २०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. परिस्थिती पाहिल्यावर आयोजकांनी शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली. सुनिल शेळकेनी कार्यकर्त्यांना दम दिला असं खोटं देखील सांगितलं. साहेबांनी (शरद पवार) देखील त्याबद्दल लगेच प्रतिक्रिया दिली.

शेळके पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आमचे श्रद्धेय आहेत, उद्या देखील राहतील. पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशाकरणं अपेक्षित होतं. मागील ५० ते ५० वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर साहेबांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती टीका केली नाही. विरोधकांवर देखील व्यक्तीगत टीका केली नाही. पण साहेबांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय, असेही आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

मी साहेबांना भेटणार असून त्यांनी मी कोणच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली ते सांगावं. मी कार्यकर्त्यांना दम दिला ही माहिती ज्यांनी दिली ती खरी की खोटी दिली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. साहेबांनी केलेल्या वक्तव्याची मी दखल घेणार. पुढील आठ दिवसात मी दम दिला असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा आणि पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी राज्यभर सांगणार की मावळ तालुक्यात येऊन साहेबांनी (शरद पवार) माझ्यावर खोटे आरोप केले, असेही सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

Sunil Shelke On Sharad Pawar Latest Politics News
Sharad Pawar on Sunil Shelke: "...तर याद राखा शरद पवार म्हणतात मला"; कार्यकर्त्यांसमोरच सुनील शेळकेंना पवारांचा कडक इशारा

ज्यांनी व्यक्तीने साहेबांना ही माहिती दिली त्याचे साहेबांनी पुरावे द्यावे, किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली हे मान्य करावं असेही सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

मला माहिती आहे की, पवार साहेब माझ्या प्रचारासाठी माझ्या मतदारसंघात आले. दादांनी मला उमेदवारी दिली हे मी आजही विसरलेलो नाही. पण जो व्यक्ती माझ्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवतो. जो व्यक्ती हजारो कोटी रुपयांचा निधी विकासकमांसाठी देतो त्या अजितदादांची साथ मी का सोडावी? त्या अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणं उभं राहवं हे माझं व्यक्तीगत मत होतं. यात कोणाल चूक वाटत असेल तर जनता पुढे निर्णय घेईल असेही सुनिल शेळके म्हणाले.

साहेबांनी माझी अशी दखल घेणं, मला तंबी देणं हे मला साहेबांकडून अपेक्षित नव्हतं. ते माझ्याविषयी असं का बोलले असा प्रश्न मला पडलेला आहे असेही शेळके यावेळी म्हणाले.

Sunil Shelke On Sharad Pawar Latest Politics News
PM Modi In Jammu and Kashmir: मनं जिंकण्यासाठी आलोय अन् जोपर्यंत...; 370 कलम हटवल्यानंतर मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये

शरद पवार शेळकेंना काय म्हणाले होते?

कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंना इशारा देताना शरद पवारांनी चांगलाच दम दिला होता. शरद पवार म्हणाले की, म्हणाले, "तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. ज्यानं ही सही केलीए त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता.

माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा तुम्ही दमदाटी केलीत आता बास्स, पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला... मी खरंतर तर या रस्त्यानं जात नाही पण जर या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही" असे पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.