Ajit Pawar : अजितदादांना आपण चुकलोय हे समजलंय, त्यामुळंच ते नाराज आहेत; काय म्हणाले ठाकरे गटाचे आमदार?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे उसनवारीत आणणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
Ajit Pawar Vaibhav Naik
Ajit Pawar Vaibhav Naikesakal
Updated on
Summary

इतिहास संशोधकांच्या मतानुसार छत्रपतींची ही वाघनखे नाहीत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाले.

कुडाळ : अजित पवार (Ajit Pawar) हे सरकार स्थापन होण्यापूर्वी आमच्याबरोबर होते. त्यावेळी भाजप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. भाजपने (BJP) त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले; मात्र आज अजितदादांना आपण चुकलो, हे समजले आहे. त्यामुळे अजितदादा सत्तेबाबत नाराज आहेत, हे कालच्या दोन बैठकांमध्ये दिसून आले, असा दावा आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

दसरा मेळावा १९६८ पासून शिवतीर्थावरच होतो, तो तिथेच होईल, असेही ते म्हणाले. आमदार नाईक म्हणाले, ‘‘दसरा मेळाव्यात वर्षभरात कार्यकर्त्यांची उद्दिष्टे, काम याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मार्गदर्शन करतात. आता शिंदे गट मोदी-शहांना नेते मानतो. मागील वर्षी शिंदे यांच्या भाषणावेळी लोक उठून गेले होते. यावेळी सुद्धा तेच होईल. त्यामुळे नीतिमत्ता असेल, तर शिंदे गट यावेळी दसरा मेळावा घेणार नाही.

Ajit Pawar Vaibhav Naik
Bhaskar Jadhav : राज्यात 8 महिन्यांत 9 ठिकाणी जातीय दंगली, या मागं भाजपचाच हात; आमदार जाधवांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा नाही. येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन मिळत नाही. गर्भवती महिलांना आवश्यक असणारी औषधे उपलब्ध नाहीत. राज्याने नुकताच ''शासन आपल्या दारी'' हा कार्यक्रम राबविला; पण यासाठी जिल्हा नियोजनमधून १ कोटीचा निधी घेतला.

Ajit Pawar Vaibhav Naik
Uday Samant : 'मी वाघनखांच्या जवळ होतो, तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून अंगावर..; सामंतांनी सांगितला थरारक अनुभव

हाच निधी आरोग्यासाठी वापरता आला असता." दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे उसनवारीत आणणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इतिहास संशोधकांच्या मतानुसार छत्रपतींची ही वाघनखे नाहीत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाले.

Ajit Pawar Vaibhav Naik
Girish Mahajan : अजितदादा खरंच नाराज? महाजनांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचं 'हे' कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.