MLC Election: विधान परिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर; 'या' दोन माजी खासदारांना एकनाथ शिंदेंनी दिली संधी

Eknath Shinde: या दोन्ही माजी खासदारांना विधान परिषदेत संधी देत एकनाथ शिंदे यांनी एका प्रकारे या माजी खासदरांचे पुर्वसन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal

राज्यात 11 जगांवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 5 उमेदवार जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत तिकिट कापलेल्या कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही माजी खासदारांचे एकनाथ शिंदे यांनी एका प्रकारे या माजी खासदरांचे पुर्वसन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून भावना गवळी तर रामटेक मदारसंघातून कृपाल तुमाने यांचे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेने तिकिट कापले होते. यानंतर गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही माजी खासदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण आता विधान परिषदेसाठी दोन्ही नेत्यांना संधी देत एकनाथ शिंदे यांची त्यांची नाराजी दूर केली आहे.

CM Eknath Shinde
Kishor Darade: नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा, किशोर दराडे यांचा दणदणीत विजय

भाजपकडून पाच जणांना संधी

एकून 11 जागांसाठी होणाऱ्या या विधान परिषद निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर भाजपचे 5 आमदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि परिणय फुके यांना संधी दिली आहे.

तर अजित पवार यांची राष्ट्रवादी परभणीचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे.

CM Eknath Shinde
Anil Parab Wins Mumbai Graduate : मुंबई पदवीधरमधून अनिल परब विजयी; ठाकरे गटाचा जल्लोष

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला होता. यामध्ये भाजपची 23 जगांवरून 9 जगांवर घसरण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जगांवर यश मिळाले. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला होता.

दुसरीकडे महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 9 जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या होत्या.

सांगलीतून बंडखोरी करत निवडणूक जिंकलेल्या विशाल पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे 14 खासदार झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com