Babri Demolition: चंद्रकांत पाटीलांच्या वक्तव्यावरून मनसेही आक्रमक; शेयर केला 'तो' Video

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून शिवसेना मनसे आक्रमक
Chandrakant Patil and Raj Thackeray_BMC Election
Chandrakant Patil and Raj Thackeray_BMC ElectionTeam eSakal
Updated on

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना तिथे गेली होती? कारसेवक हे हिंदू होते. ते बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या व्यक्तव्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पडली, तेव्हा हे सगळे उंदीर बिळामध्ये लपले होते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल संताप व्यक्त केला.

त्यानंतर आता मनसेनेही ट्वीट करत पाटील यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जोरदार टीका सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना स्पष्टीकरण देण्यासाठी सांगितले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी बाजू मांडत ते वक्तव्य बाळासाहेबांबाबत नसून संजय राऊत यांच्याबद्दल होते, अशी सारवासारव त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईत हिंदू जिवंत आहेत. बाबरी पडली, तेव्हा तेथे शिवसैनिक होतेच, पण भाजप किंवा शिवसेना पक्ष म्हणून ती पाडली गेली नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Chandrakant Patil and Raj Thackeray_BMC Election
Narendra Modi: "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल; PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील"

तर मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मनसेच्या ट्वीटमध्ये व्हिडीओ असून बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे. बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी हा प्रसंग ऐकावा, असे त्यात म्हटले आहे.

Chandrakant Patil and Raj Thackeray_BMC Election
Dhananjay Munde: मुंडे बहिण-भाऊ एकत्र, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

तर ही भाजपची चाल असून हळूहळू त्यांना बाळासाहेबांचे महत्त्व लोकांच्या मनातून कमी करायचं आहे. मनावर ओझं ठेवून जो दगड बसवलेला आहे, तो आता जड व्हायला लागलाय, अशी परिस्थिती भाजपच्या इथल्या नेतृत्वाची आहे. बाळासाहेबांचा अपमान करताहेत, त्यांचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता कुणाला जोडे मारणार आहात, की स्वतः च स्वतःला मारणार आहात? बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.