MNS-Thackrey Alliance: एका गाडीतून प्रवास आणि पुन्हा ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा! मनसेचा ठाकरे गटाकडे युतीचा प्रस्ताव?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?
MNS-Thackrey Alliance
MNS-Thackrey AllianceEsakal
Updated on

मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे. मनसे नेते अभिजीत पानसे हा प्रस्ताव घेऊन गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला यावेळी त्यांच्यात युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  (Marathi Tajya Batmya)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली. तर राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Marathi News)

MNS-Thackrey Alliance
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

दरम्यान या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फुट पडली त्यानंतर आता मनसेकडून हा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. (Marathi Tajya Batmya)

MNS-Thackrey Alliance
Bhujbal On retirement: शरद पवारांना रिटायर व्हा म्हणणारे अजित पवार ठरवणार भुजबळांची रिटायरमेंट...

तर दैनिक सामनाच्या कार्यालयात अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्याचबरोबर राऊत आणि पानसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहे. तर मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.(Latest Marathi News)

MNS-Thackrey Alliance
Shivsena MLA : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; 10 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.