Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसे शिंदे-फडणवीसांविरोधातही देणार उमेदवार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

raj thackeray on assembly election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी मनसे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधातच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात देखील उमेदवार देणार आहे. पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल बोलतना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच काही नेत्यांनी संविधान बदलणार अशी घोषणा केल्याने, देशातील दलित समाजाने मोदी-शाह यांच्या विरोधात मतदान केले. ते अँटी मोदी-शाह मतदान होते, ते काही उद्धव ठाकेर आणि शरद पवार यांच्या प्रेमापोटी झालेलं मतदान नव्हतं. त्यामुळे ती वाफ लोकसभेला निघाली. आता विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात या लोकांनी जे गलिच्छ राजकारण केलं, ते राजकारण लोकं विसरलेले नाहीत. ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रात झाला तो मला वाटत नाही की यापूर्वी गेल्या ५०-६० वर्षांमध्ये झाला असेल. लोकांनी असा काही विचार देखील केला नसेल. मतदार ही गोष्ट विसरलेले नाहीत आणि याचा राग ते आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की काढतील असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Raj Thackeray
Satara Accident : आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले! दोन युवक ठार; बिदाल-शेरेवाडीवर शोककळा

यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ढासळलेल्या सामाजिक स्थितीवर, तसेच फोडाफोडीच्या राजकारणावर देखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त शरद पवार आहेत, कारण शरद पवारांनी या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रात केली. पुलोद स्थापन झालं तेव्हापासून याला सुरूवात झाली. त्यांनी १९९१ ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ, नारायण राणे वगैरे अनेक लोकं फोडले... सगळं राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं... यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच कालवलं. १९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाला त्यानंतरचा आणि त्यापू्र्वीचा महाराष्ट्र बघा. याआधी महापुरूषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. जातीचं विष १९९९ साल पासून सुरू झाली असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
विधानसभेच्या तोंडावर शिंदेंच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीतील पदाधिकाऱ्यांच्या 'फ्री स्टाईल' हाणामारीचा Video Viral

विधानसभेला शिंदे-फडणवीसांविरोधात उमेदवार देणार?

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील आपण विधानसभेला उमेदवार देणार का? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, मी निवडणुक लढवणार आहे. मागच्यावेळेला एकवेळा ही गोष्ट केली त्या मतदारसंघात साधारणपणे आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे राज ठाकरे यांना नागपुरात देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ठाकरेंनी आपण सगळ्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()