Raj Thackeray : पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर...; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Raj Thackeray : मी अनेक वर्षापासून मी मराठी या विषयावर बोलत आलो असून या विषयासाठी मी केसेस अंगावर घेतल्या जेलमध्ये देखील गेलो. मी अत्यंत कडवट मराठी आहे असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

Raj Thackeray On Marathi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी हे जर त्यांचं स्वतःचे राज्य आणि भाषेवरील प्रेम लपवू शकत नसतील तर तुम्ही आम्ही ते का लपवता असा रोखठोक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थितांना केला. विश्व मराठी संमेलनात ठकरे बोलत होते.

मी अनेक वर्षापासून मी मराठी या विषयावर बोलत आलो असून या विषयासाठी मी केसेस अंगावर घेतल्या जेलमध्ये देखील गेलो. मी अत्यंत कडवट मराठी आहे असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मराठी बद्दल बोलल्यानंतर कोणीतरी संकुचित आहेत म्हणेल, पण देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल, राज्याबद्दल वाटतं... की जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा, तर तो गुजरातमध्ये बांधावा असं पंतप्रधानांना वाटतं. गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना महाराष्ट्र, तामिळनाडू, बंगालमध्ये नको तर गुजरातमध्ये बांधावी असं वाटतंय... हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये घेऊन जावा असं वाटतोय... पण यावर माझं असं म्हणणं आहे की, पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही-आम्ही का लपवतोय?

अनेकांना ही पंतप्रधानांवर टीका वाटू शकते, ही टीका नाहीये. प्रत्येकामधील आतल्या मुळ माणसाला आपल्या राज्याबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे, मग तुम्ही का लपवताय? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Raj Thackeray
Nitish Kumar Resigned: नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपकडून पाठिंबा

माझ्या राज्यामध्ये एखादा मराठी माणूस घर घ्यायला जातो आणि त्या सोसायटीमधील जैन माणूस मराठी माणसाला घर देणार नाही असं सांगतो. हे तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ मध्ये करून दाखवा. पैसे असून देखील घर दिलं जात नाही. हे महाराष्ट्रात होतं कारण आपलं बोटचेपे धोरण. आपण आधीच मागे हटतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.