Raj Thackeray On RSS : "एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही...", राज ठाकरेंकडून 'आरएसएस'चं तोंडभरून कौतुक

RSS Dasara Melava 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध नेत्यांच्या दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
raj thackeray
raj thackeraySakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध नेत्यांच्या दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्याच दिवशी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात देखील दसरा मेळावा पार पडला. विजयादशमीच्या मुहूर्तावर आरएसएस शंभरीत पदार्पन करत आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरएसएसचे कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी तशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा संघाला ९९ वर्ष पूर्ण झाले असून संघटना १००व्या वर्षात पदार्पन करत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी संघ स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या ९९ वर्षात संघाने मोठे काम केल्याचेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

raj thackeray
Amol Mitkari Ravan Puja: "रावणानं बाप म्हणून सीतेचं अपहरण केलं"; अमोल मिटकरींच्या दाव्यानं वादाची शक्यता

नेमकं राज ठाकरे काय म्हणाले?

"आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे."

"संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे."

raj thackeray
Prathamesh Parab : पाण्यासाठी भांडणं ते चार पायऱ्यांवरचं गल्ली क्रिकेट ; प्रथमेशने उलगडल्या त्याच्या चाळीतील घरातील आठवणी

"मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.