Raj Thackeray : "ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,..."; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाला राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच अनेक कार्यकर्ते राज ठाकरेंना भेटून शुभेच्छा देतात. वाढदिवसाच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून एक खास अवाहन केले आहे.

पण तरीही महाराष्ट्र सैनिकांनी भेटीला येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येऊ नयेत असं राज ठाकरे म्हणाले आहेत. "दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackeray
Wari 2023 : फडणवीसांचा दावा खोटा? पोलिसांनी एकांतात नेऊन मारलं, जळगावच्या विद्यार्थी-वारकऱ्याचा Video Viral

"पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे." असे अवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray
'ते' ओरिजनल फुटेज सापडलंच नाही…; शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांकडून लवकरच आरोपपत्र

"सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन.तेंव्हा भेटूया १४ जूनला" असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे हे दोन दिवसांनी १४ जून रोजी ते वयाची ५४ वर्षे पूर्ण करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()