Amol Mitkari: पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती! मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू ह्दयविकाराने नव्हे तर मारहाणीमुळे

Jay Malokar: गाडी फोडल्याची घटना घडल्यानंतर जय मालोकर हे नेमके कुठे गेले होते, तीन तास ते कुठे होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावं, अशी मागणी होत आहे.
Amol Mitkari: पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती! मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू ह्दयविकाराने नव्हे तर मारहाणीमुळे
Updated on

MNS News: राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज केल्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. या घटनेनंतर एका मनसैनिकाचा ह्दयविकाराने मृत्यू झाला होता. परंतु हा मृत्यू ह्दयविकाराने झालेला नसल्याचं पुढे आलेलं असून जय मालोकर यांना मारहाण झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून पुढे आलं आहे.

जल मालोकर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं झालं आहे. शवविच्छेदन अहवालामुळे ही बाब उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहावर आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली होती. या राड्यानंतर मनसेच्या १२ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

त्याच रात्री गुन्हा दाखल झालेल्यांपैकी जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू ह्दविकाराने झाल्याचं सांगितलं जातं होतं. परंतु बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण उघड झालं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जय यांच्या डोक्याला, अंगावर आणि ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचं उघड झालं.

याशिवाय जय यांच्या मेंदूला सूज होती, यावरुन त्यांना कुठल्यातरी वस्तूने मारहाण झाल्याचं कळतंय. गाडी फोडल्याची घटना घडल्यानंतर जय मालोकर हे नेमके कुठे गेले होते, तीन तास ते कुठे होते असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावं, अशी मागणी होत आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्ते दिले आहे.

Amol Mitkari: पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती! मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू ह्दयविकाराने नव्हे तर मारहाणीमुळे
One Nation One Election : भारतातील 'वन नेशन वन इलेक्शन'ची प्रथा इंदिरा गांधींच्या काळात का थांबली ?

नेमकं प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख 'सुपारीबाज' असा केला होता. यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले आणि अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसे सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना 'सुपारीबाज' म्हणाल्याने मनसे सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.