MNS: चिन्हं बदलतात…कुणाची गोठतात, आमचं इंजिन सुसाट धावतंय; मनसेचं ट्विट चर्चेत

Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

मुंबई - शिवसेना पक्ष कोणाचा याचा पेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणूक आयोगाने या संदर्भात शनिवारी निकाल देत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे. यावर आतापर्यंत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना यावर प्रतिक्रिया देण्यास मज्जाव केली आहे. मात्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चिन्हावर प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray news in Marathi))

Raj Thackeray
Shivsena Battle: "भाजप नेत्यांनी अद्याप फडणवीस-शिंदेंना पेढे का भरवले नाहीत"

अमेय खोपकर यांनी ट्विट करून म्हटलं की, चिन्हं बदलतात…कुणाची गोठतात आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतंय, असं ट्विट केलं आहे. त्यामुळे मनसेचं हे ट्विट चर्चेत आलं आहे.

दरम्यान शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा सर्वाधिक रोष भाजपवर दिसून येत आहे. तशा स्वरुपाच्या टीकाही उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आल्या आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते, असंही आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.