Amit Thackeray Wife : दहा वर्षे होती मैत्री, अमित ठाकरे कसे पडले आपल्याच मैत्रीणीच्या प्रेमात

Amit Thackeray Love Story: तुम्हाला अमित ठाकरेंच्या पत्नीविषयी काही माहिती आहे का?
Amit Thackeray Wife
Amit Thackeray Wife sakal
Updated on

Amit Thackeray Wife : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव म्हणजे राज ठाकरे. मराठी लोकांविषयी त्यांचा जिव्हाळा, त्यांची धडपड प्रत्येकाने बघितली. मराठी माणसाच्या हक्कासाठी ते नेहमी आवाज उठवत असतात, लढत असतात.

आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अमित ठाकरे सुद्धा राजकारणात भरीव कामगिरी करत आहे. पण तुम्हाला अमित ठाकरेंविषयी काही माहिती आहे का? आज आपण त्यांची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. (MNS Leader Amit Thackeray Spouse Wife mitali thackeray love story )

अमित ठाकरे आणि मिताली यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी पार पडला पण फार कमी लोकांना त्यांची लव्हस्टोरी माहिती असेल. राज ठाकरे यांची धाकटी मुलगी उर्वशी आणि मिताली खूप चांगल्या मैत्रीणी होत्या तर याच मिताली अमित ठाकरेंना  मुंबईतील पोदार कॉलेज कॅम्पसमध्ये भेटल्या.

दोघांची छान मैत्री झाली. कुटूंबाची ओळख असल्याने त्यांची मैत्री आणखी दृढ झाली. यादरम्यान मिताली कृष्णकुंजवर नेहमी यायच्या. त्यामुळे कुटूंबाशीही त्यांची जवळीक झाली.

Amit Thackeray Wife
Raj Thackeray Net Worth : अबब! राज ठाकरेंकडे आहेत एवढ्या कोटींची संपत्ती; वाचून व्हाल थक्क

दोघांच्या मैत्रीत थोडा थोडा प्रेमाचा रंग येत होता. यादरम्यानच अमित ठाकरे अचानक गंभीर आजारी पडले. मितालीने त्यावेळी खंबीरपणे साथ देत अमित ठाकरे यांची खूप काळजी घेतली आणि त्यांना त्यातून बाहेर काढले.

याचदरम्यान अमित ठाकरे यांनी मितालींना लग्नासाठी विचारले आणि मितालीने लगेच होकार दिला. एक चांगली मैत्रीण, एक चांगली प्रेयसी आणि एक चांगली बायको म्हणून मिताली नेहमीच अमित ठाकरेंसोबत खंबीरपणे उभ्या होत्या.

Amit Thackeray Wife
Raj Thackeray: राज ठाकरेंनी कुटुंबियांसोबत सोबत उभारली गुढी,केलं नववर्षाचं स्वागत

मिताली या मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांच्या कन्या आहेत. मितालीने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. सध्या मिताली आणि अमित ठाकरेंना किआन नावाचा एक गोंडस मुलगा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.