‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील, अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा मुलगा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं.
मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi Government) राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केली होती. सुजात यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी 'मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है!' असं म्हणतं प्रकाश आंबेडकरांच्या मुलावर जोरदार टीका केलीय.
शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी फेसबुक पेजवरती लिहिलंय, सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितलंय. तुमचं राजकारणातलं वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आलीय का? असा सवाल त्यांनी सुजात आंबेडकरांना केलाय. ठाकरे यांच्या प्रत्युत्तरानंतर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. अशावेळी सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल, तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा. मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असं वक्तव्यही सुजात आंबेडकर यांनी केलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.