राज्यातल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. या सरकारला मनसेनेही पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता या सरकारवर मनसे नाराज असल्याची चिन्हं दिसत आहेत. याचं कारण म्हणजे मनसे आमदाराचं एक ट्वीट.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट केलंय. आपल्या ट्वीटमध्ये राजू पाटील म्हणतात, बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय झालंय, सगळं काही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लक्ष राज्यातल्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता मनसे आणि शिंदे फडणवीस सरकारचे खटके उडालेत का? की मनसे सरकारवर नाराज आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.