MNS: '...हे बाळासाहेबांना कदापि पटलं नसतं', भाजप-सेना काय भूमिका घेणार? INDvsPAK सामन्यावरुन मनसेचा सवाल

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन मनसेचा सवाल
MNS
MNSEsakal
Updated on

बहुप्रतीक्षित क्रिकेट विश्वचषक सामन्याचे वेळापत्रक आयसीसीने दोन दिवसांपुर्वी जाहीर केलं आहे. विश्वचषकातील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या स्टेडियममध्ये 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना आयोजित करण्यात आला आहे, आता या सामन्यावरूनव विरोध सुरु झाल्याचं चित्र आहे. तर पाकिस्तान सोबतच्या सामन्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवत शिंदे फडणवीस सरकारला सवाल केला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी यावर भाष्य केलं आहे. "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात होणं हे अजिबात पटणारं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही कदापि पटलं नसतं," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत भाजप आणि शिवसेनेची याबाबत काय भूमिका आहे असा रोखठोक सवलाही त्यांनी यावेळी केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांच्यावरही संदीप देशपांडे यांनी निशाणा साधत त्यांनी हिंदुत्त्व सोडल्याची टीका देखील केली आहे.(Latest Marathi News)

MNS
Weather Update: राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट

संदीप देशपांडे यांनी संबधी ट्विट केलं आहे. ट्विटमद्धे देशपांडे यांनी लिहलं आहे कि, "भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही. यावर भाजप आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे? उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे."(Latest Marathi News)

MNS
ODI World Cup 2023 : वर्ल्डकपच्या मैदानात राजकारण रंगणार? भारत vs पाकिस्तान सामन्यावर CM शिंदे घेणार का मोठा निर्णय

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सामन्याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. याच कारण म्हणजे पाकिस्तानी संघाने भारतामध्ये खेळण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र आहेत, तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे खजिनदार आहे. या संबधामुळे सामन्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()