सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने मनसेने दोन उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पंढरपूरमधील दिलीप धौत्रे यांना संधी देण्यात आली आहे.
राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोलापूरमध्ये असतानाच राज ठाकरे यांनी पंढरपूरमधून दिलीप धौत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, शिवडीमधून अपेक्षेप्रमाणे बाळा नांदगावरकर यांचे नाव समोर आले आहे.
१. शिवडी विधानसभा- श्री.बाळा नांदगांवकर
२. पंढरपूर विधानसभा - श्री.दिलीप धोत्रे
राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता, पण विधानसभा पक्ष एकट्याने लढणार आहे. राज ठाकरेंनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. २२५ ते २५० उमेदवार विधानसभेसाठी उभे केले जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उमेदवारांची घोषणा करून राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
दिलीप धोत्रे हे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत काम करत आहेत. धोत्रे यांनी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यात संघटनेचे काम वाढवले आहे. अलीकडेच दिलीप धोत्रे यांच्याकडे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी धोत्रे यांनी २००४ साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी पंढरपूरमधून विश्वासू शिलेदाराला मैदात उतरवलं आहे असं म्हणावं लागेल.
राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी कंबर कसल्याचं दिसत आहेत. जवळपास २५० मतदारसंघांचा अभ्यास केला जात आहे. यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. जिंकून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.