जरांगेंना तोंडावर सांगितलं होतं, आरक्षण मिळणार नाही; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही
raj thackeray
raj thackerayEsakal
Updated on

मुंबई- जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. जरांगें पाटील यांच्या बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल.

जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागून कोण आहे. जातीय वादातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या पुढे हा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे मला या गोष्टी काही सरळ वाटत नाहीत. कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असं राज ठाकरे म्हणाले.

raj thackeray
Ketaki Chitale : 'कितीही शिव्या घाला पण मी....'! हर हर महादेव म्हणत केतकीची ललकार

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. याआधी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण, यावरुन राज्यात ओबीसी-मराठा असा वाद निर्माण झाला आहे.

लोकांचं लक्ष हटवण्यासाठी असे विषय काढले जातात. स्वार्थी राजकारणासाठी महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे. मी राजकारणात जात पाहत नाही, माणूस पाहतो. पण, काही राजकीय पक्ष राजकीय तणाव निर्माण करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद निर्माण झाला. काका-पुतण्यांमध्ये काय चाललंय हे समजतच नाही. अशा प्रकारची घाणेरडी राजकीय परिस्थिती मी यापूर्वी कधीही पाहिली नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

raj thackeray
हर हर महादेव म्हणत मतदान.. ;उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

आता उघडपणे मतदारांना मूर्ख बनवलं जात आहे. येणाऱ्या काळात मतदार काय करतील हे मला पाहायचं आहे. पाच वर्षात जे घडलं ते न पाहता, वेगळाच मुद्द्यावर मतदान देऊन मोकळं व्हायचं. आपल्याला कोणीच विचारत नाही अशी भावना राजकीय नेत्यांची झाली आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या मुद्द्यावर राजकीय नेते काहीच करत नाहीत, मतदार नुसता शिकलेला नाही, तर सुज्ञ असायला हवा, असं ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.