MNS Raj Thackeray : 'सध्याचं वातावरण बघता मी कुणाशी युती करेन असं वाटत नाही'; राज ठाकरेंचं विधान

मी असलं व्याभिचारी राजकारण करणार नाही असं ते म्हणाले
MNS Raj Thackeray : 'सध्याचं वातावरण बघता मी कुणाशी युती करेन असं वाटत नाही'; राज ठाकरेंचं विधान
Updated on

दापोली : राज्यातलं वातावरण पाहता मला वाटत नाही मी येणाऱ्या निवडणुकासाठी कुणाशी युती करेन, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते सध्या कोकणातील दापोली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

"2 ते 3 वर्षे निवडणुका प्रलंबित राहतात, त्यावर कुणीच काही बोलत नाही. मी असलं व्याभिचारी राजकारण करणार नाही. ते मला जमणारही नाही. याला जर राजकारण म्हणत असाल तर त्या राजकारणासाठी मी नालायक आहे. अशा वेळी घरात बसेन पण मी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही." असं राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

MNS Raj Thackeray : 'सध्याचं वातावरण बघता मी कुणाशी युती करेन असं वाटत नाही'; राज ठाकरेंचं विधान
Himachal Rain Video : बघता बघता इमारत झाली जमीनदोस्त; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

"माझ्या मनात संताप आहे तो मी येत्या काही दिवसांत मेळावा घेऊन बाहेर काढणार आहे. पण तुमचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. मोबाईल फोन या माध्यमामुळे अनेकजण राजकारण्यांबद्दल सोशल मीडियावरच राग व्यक्त करतात आणि शांत बसतात." असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे भाजपच्या बाजूने बोलतात असा आरोप त्यांच्यावर होत होता. त्यामुळे ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात असे दावे केले जात होते. त्यानंतर त्यांनी आता सध्याच्या राजकारण बघता कुणाशीच युती करेल असं वाटत नाही असं विधान केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.