मुंबई- टोल माफी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याप्रकरणी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज सरकारचे प्रतिनिधी आणि मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या आणि काही बदल सुचवले आहेत.
टोल कंत्राटदारांसोबत झालेल्या करारामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या. त्या काही गोष्टीत सुधारणा व्हायला हवी अशी मागणी सरकरकडे केली आहे. अविनाश जाधव यांचे टोल बंद करण्यासाठी आंदोलन सुरु होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ४ चाकी वाहनांना टोल नाहीच. म्हणजे असाच टोल घेतला जातोय का ? यावर चर्चा झाली, असं राज ठाकरे म्हणाले.
१. पुढचे १५ दिवस मुंबईतल्या ५ एन्ट्री पॉईन्ट्सवर कॅमेरे असतील. हे कॅमेरे सरकारचे असतील. तसेच मनसेचेही येथे कॅमेरे असतील. किती वाहने टोलनाक्यावर येतात हे पाहिलं जाणार आहे
२. टोल नाक्यांवरती स्वच्छ प्रसाधनगृहे असावीत, महिलांसाठी प्रसाधनगृहांची सोय प्रत्येक टोलनाक्यांवर असावी
३.पिवळ्या रेषेमागे वाहन ४ मिनिटांपेक्षा जास्तवेळ थांबल्यास टोल आकारला जाऊ नये (२०० ते ३०० मिटर अंतरावरील येलो लाईनच्या पलीकडील सर्व वाहनांना विना टोल सोडण्यात यावेत)
४. ठाणेकरांनी आनंदनगर किंवा एरोली टोलनाक्यावर एकदाच टोल भरावा
५. रस्ते खराब असल्यास टोल भरला जाणार नाही
६. मुंबई एन्ट्री पॉईन्ट, वांद्रे सीलिंक, एक्स्प्रेसवेवर टोलची कॅगतर्फे चौकशी केली जावी
७. टोलनाक्याच्या परिसरातील नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये पास देण्यात यावे
८. टोलनाक्यावर तैनात असणारे कर्मचारी उर्मट असतात. त्यांच्या ऐवजी सरकारी यंत्रणेचे कर्मचारी तेथे असावेत
९. टोकनाक्यावर फास्टटॅग चालला नाही, तर एकदाच टोल भरायचा परत टोल भरायचा नाही. दोनदा टोल कपात झाल्यास याबद्दल तक्रार करता यावी
१०. पाच रुपये वाढीव टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला एक महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे
११. प्रथमोपचारसाठी लागणारी सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलिस अंमलदार फोन टोल नाक्यावर असावे
१२. करारामध्ये नमूद सर्व उड्डाणपूल, भुयारीमार्ग यांचे डिटेल ऑडिट केले जावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.