Raj Thackeray : टोलचे पैसे जातात कुठे? लाव रे तो व्हिडिओ...; राज ठाकरेंनी दाखवल्या 'त्या' ७ क्लिप्स

राज ठाकरे टोलच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
MNS Raj Thackeray Shows devendra fadnavis ajit pawar Old Videos clips on highway toll Potholes Maharashtra news
MNS Raj Thackeray Shows devendra fadnavis ajit pawar Old Videos clips on highway toll Potholes Maharashtra news
Updated on

राज्यातील रस्त्यांची खराब स्थीती, रस्त्यांवर पडलेल्या खड्डे आणि महामार्गांवर लावण्यात येत असलेल्या टोलच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. महामार्गावरील टोल वाढीवर मनसे नेते अविनाश जाधव उपोषण बसले होते. यानंतर राज्य सरकरकडून एक पत्र आले होते, ज्यामध्ये टोलबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती. दरम्यान यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, आपलं टोलचं आंदोलन २००९-१० च्या सुमारास सुरू झालं, हा टोलचा सगळा कॅशमधला पैसा जातो कुठे? याचं होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्याना हे टोल मिळतात कसे? यानंतरही शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले.

MNS Raj Thackeray Shows devendra fadnavis ajit pawar Old Videos clips on highway toll Potholes Maharashtra news
Israel Palestine Conflict : इस्रायली सैन्याची पहिली मोठी शिकार! हमासच्या नौदल कमांडरला उचललं

त्यावेळेला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजप काय म्हणाले हे मला दाखवायचं आहे असे म्हणत पत्रकार परिषदेतच राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे टोल संबंधीत जुने सात व्हिडिओ दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या जुन्या क्लीप त्यांनी दाखवल्या.

MNS Raj Thackeray Shows devendra fadnavis ajit pawar Old Videos clips on highway toll Potholes Maharashtra news
Mla Disqualification Case Maharashtra: तारीख ठरली! शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आता एकत्रितपणे सुनावणी

व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, ही माणसं प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात, या सगळ्यांची सरकारे महाराष्ट्रात येऊ गेली पण एकही गोष्ट झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांचं उदरनिर्वाहाचं साधण आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

त्यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला महिन्याला या टोलमधून पैसे जातात. यामुळे टोल बंद केले जाणार नाहीत. यातून तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. हे लोकं थापा मारतात आणि पुन्हा यांनाच मतदान केलं जातं हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.