भाजप नेते-राज ठाकरे भेट, मनसे-भाजप युतीवर संदीप देशपांडेंचं वक्तव्य

sandip deshpande
sandip deshpandeesakal
Updated on

मुंबई : शिवसेनेसोबतची युती तुटल्य़ानंतर भाजपनं मनसेसोबत (bjp-mns) युती करण्यासाठी पावले उचलली आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानतर काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे-भाजप युती (mns-bjp alliance) होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनी भाजपसोबतच्या युतीवर महत्वाची माहिती दिली आहे.

मनसे- भाजप युती होणार का?

केवळ भाजपचेच नाही, तर इतर पक्षाचे नेतेही राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे खलबत असं काही नाही. या चर्चा प्रसाद लाड सोबत होणार नाही, तर वरिष्ठ लोकांसोबत होतील. आज महापालिका निवडणूकबाबत चर्चा नाही. चर्चा होत असतील वा नसतील हे मला माहित नाही. राज ठाकरे योग्य वेळी माहिती देतील. युतीबाबत सध्या चर्चा सुरू मला वाटत नाही. युतीबाबत पूर्ण जबाबदारी राज ठाकरे निर्णय घेतील. त्याची अंमलबजावणी करण्यात काम आमच्यासारखे महाराष्ट्र सैनिक करतील.

महापालिकेत मोठ्या प्रमाणात संधी

आम्ही गेले दिड वर्ष सातत्याने महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढलेत. कोविड काळात भ्रष्टाचार, बेड, जम्बो कोविड सेंटर, रस्ते असे अनेक घोटाने आम्ही बाहेर आणत आहे. जनता शिवसेनेच्या कारभाराला कंटाळले आहेत. जनता आता वेगळा विचार करेल. मध्यंतरी बैठक झाली. त्यावेळी सर्व लोकांनी स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे असं मत व्यक्त केलं. कोविड काळात अनेकांनी काम केलं आहे. पूरग्रस्त लोकांना मदत केली आहे. जनता यावेळी मुंबई, पुणे ,नाशिक, ठाणे सर्व महापालिकेत मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल.

मेस्मा निर्णयावर बोलताना...

हा संप हाताळण्यासाठी अनिल परब सपशेल अपयशी ठरले. जी चर्चा करायला हवी ती केली नाही. हे मराठी माणस आहेत. यांना मेस्मा लावण्यापेक्षा अनिल परब यांनी राजीनामा द्यावा म्हणजे मार्ग निघेल.

sandip deshpande
हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह

निवडणूक पुढे जाणार का?

ओमायक्रोन संकट कशाच्या आधारावर बोलत आहोत. दक्षिण आफ्रिकेत डॉक्टर म्हणतात हा रोग घटक नाही. मृत्यू नाही शक्यता कमी लक्षण साधी आहेत. असा त्रास सिजन बदलल्यावर होतो. त्यामुळे संकट आहे अशी ओरड नको. ओबीसी आणि ओमायक्रोन संकट वेगळा प्रश्न. महाविकास आघाडी सरकार घाबरलेत. लोकांचे प्रश्न सोडवले नाही, शाळा सुरू नाही, फी विषय सोडवले नाही, कोविडमध्ये काम नाही, नोकरी नाही, परीक्षांचे गोंधळ, मदत नाही. हे सगळं असताना सरकार ला वाटत आहे की आपण फेल झालो आहोत. दुष्काळ, पूर आले लोकांना मदत नाही. त्यामुळे घाबरून निवडणूक पुढे ढकलण्याचा बोलत आहे. 8 ते 10 महिने सरकार झोपलेले का ? का इमपीरीकल डाटा गोळा केला नाही. का प्रफरी झाली नाही, मागासवरल आयोगाला पैसे दिले का नाही याची उत्तर द्या.

sandip deshpande
वानखेडे प्रकरणातील मोहित कंबोज राज ठाकरेंसोबत,भेटीचे फोटो व्हायरल

संजय राऊत यांनी युनायटेड नेशनमध्ये काम केलं पाहिजे

आतापर्यंत शिवसेना स्वतःच्या जीवावर एकही खासदार आला नाही. जे काही खासदार आणले ते युतीतून आणले. मग UPA, देश, युनायटेड नेशन वैगरे का? संजय राऊत यांनी UPA मध्ये काम न करता युनायटेड नेशनमध्ये काम केलं पाहिजे इतकी त्यांची केपसीटी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.