Raj Thackeray : 'परंतु, आमचीच अस्मिता फक्त ठिगळं लावलेली!'; मनसेनं शेअर केलं राज ठाकरेंचं जळजळीत व्यंगचित्र

Raj Thackeray
Raj Thackeraysakal
Updated on

मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली होती. यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. दम्यान या प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुढाकार घेत जागा नाकारणाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता.

या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित असा इशारा देखील दिला होता. दरम्यान मनसेने या प्रकरणावर राज ठाकरे यांचं जुनं व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

Raj Thackeray
Ajit Pawar News : अजित पवारांसोबत खडाजंगी झाल्याच्या चर्चांवर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

सोशल मीडिया प्लॅटफॉम 'एक्स'वर मनसे अधिकृत या खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी रेखाटलेलं एक जुनं व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. यासोबत "राजधानी हातातून गेली की राज्य गेलं... आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत." असे म्हटले आहे.

Raj Thackeray
Covid Centre Scam: कोविड सेंटरमध्ये बीएमसी अधिकाऱ्यांना वाटले 60 लाख रुपयांचे सोने, ईडीचा मोठा खुलासा

मुलुंडमध्ये तृप्ती देवरूखकर यांनी मुंबईत राहत असूनही इथल्या मराठी लोकांना घरं दिली जात नाहीत, त्यांना जाणूनबुजून डावललं जातं. अशा अनेक घटना रोज घडताना दिसतात असा एक व्हिडीओ शेअर करत आपली व्यथा मांडली होती. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुढे येत संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली होती.

यानंतर राज ठाकरे यांनी देखील मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे! अशा शब्दात मनसैनिकांचे कौतुक केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.