Sinnar Toll Naka: सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरेंसोबत काय घडलं? तोडफोडीवर मनसेचे स्पष्टीकरण

Amit Thackrey Toll Naka: अमित ठाकरेंशी बोलताना वापरली अर्वाच्य भाषा, १५ मिनिटांच्या आत फोडला टोलनाका
Amit Thackeray latest marathi news
Amit Thackeray latest marathi newsesakal
Updated on

Sinnar Toll Naka Sabotaged by MNS:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी आरोप केला की टोलनाक्यावरील कर्मचारी आणि मॅनेजरने अमित ठाकरेंसोबत गैरव्यवहार केला.त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे शिर्डीच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी सिन्नर टोलनाक्यावर अडवण्यात आली.

यावेळी त्यांच्या गाडीला फास्टॅगही लावण्यात आलेलं होतं. पण कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंशी अर्वाच्य भाषेत बोलले. ही गोष्ट मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच, त्यांनी हा टोलनाका फोडला.

ही गोष्ट समजल्यावर माध्यमांनी अमित ठाकरेंशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, "ते बोलले त्यांच्या काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत.कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला फोन लावला की गाडीला अशी अडचण येत आहे, मॅनेजर पण उद्धटपणे बोलला. ते वॉकी-टॉकीवर एकमेकांशी बोलत होते आणि वॉकीटॉकीतून आवाज बाहेर येत होता. त्यानंतर त्यांनी गाडी १०-१५ मिनिट थांबून ठेवली आणि सोडली. "

यापुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की," तर सिन्नर टोलनाक्यावर समजलं की गाडी कोणाची आहे. मी हॉटेलला पोहोचल्यावर मला समजलं की टोलनाका फुटला. तर अशी घटना झाली ही. साहेबांमुळे (राज ठाकरे) महाराष्ट्रातील ६५ टोलनाके बंद झाले.माझ्यामुळे अजून एक अ‍ॅड झाला."

Amit Thackeray latest marathi news
Suriya Birthday : फॅक्टरीमध्ये नोकरीला होता, पण भावानं नाद नाय सोडला!

मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर येथील टोलनाका फोडल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष अंकुष पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी सांगितलं की अमित ठाकरे यांच्या गाडीवरील फास्टटॅग स्कॅन होऊनही टोलनाक्यावरील इलेक्ट्रिक दांडा उघडला न गेल्याने पदाधिकाऱ्यांनी दांडा बाजूला करण्याची टोल प्रशासनाला विनंत केली होती.

परंतु संबंधित मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांना अर्वाच्य भाषा वापरल्याचा दावा त्यांनी केला आणि ही घटना समजल्यावर नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर आंदोलन केल्याचे स्पष्टीकरण अंकुष पवार यांनी दिले.

Amit Thackeray latest marathi news
Anil Ambani: फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका, भाडेतत्त्वावरील 'ही' 5 विमानतळे घेणार परत

याआधीही मनसेकडून टोलनाके फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. मनसेने कार्यकाळ पूर्ण होऊनही टोल वसूली करणाऱ्या टोलनाक्यांवर आंदोलन करुन ६५ टोलनाके बंद पाडले होते.

Amit Thackeray latest marathi news
CJI Chandrachud On AI : सीजेआय चंद्रचूड यांचे 'एआय'बाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.