MNS Vs Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. या टीकेवरून हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांकडून राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान आज बुलढाण्यातील शेगाव येथे राहुल गांधी यांची आज सभा होत आङे, या सभेच्या ठिकाणी राहुल गांधींचा निषेध नोंदवसाठी आता राज्यभरातील मनसैनिकांना शेगाव पोहोचण्याची निर्देश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
मनसे कार्यकर्त्ये तसेच प्रमुख नेत्यांना शेगाव येथे पोहचण्याआधीच बुलढाण्याजवळील चिखली येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान सोशल मिडीयावर मनसे कार्यकर्ते शेगावला प्रसिध्द कचोरी खायला येत आहेत, अशा आशयाच्या मीम्स व्हायरल होत आहेत.
हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?
मनसे कार्यकर्ते शेगावकडे निघाल्यानंतर जो बायडेन असं ट्विटर यूजरनेम असलेल्या वापरकर्त्याने शेगाव कचोरीवर सेटलमेंट होण्याची शक्यता असल्याचे ट्विट केलं आहे.
तर एका वापरकर्त्याने तर या आणि शेगावची कचोरी खाऊन वापस जा अशी कमेंट करत मनसेच्या घोषणेचे ट्विट रिट्विट केलं आहे.
एका वापरकर्त्यांने विदर्भाच्याच भाषेत "खर तर मनसे कार्यकर्ते शेगावची कचोरी खायला येवू राहिले" असं म्हणत खिल्ली उडवली आहे.
'ब्रिजभूषण पण शेगावमध्ये दाखल होणार आहेत.... तेव्हापासून मनसे वाले काही दिसत नाहीत ही बातमी खरी आहे का?' असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदाराचा संदर्भ देथ खोचक टाला लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.