बूथ एजंटांना मोबाईल नो अलाऊड! सोलापूर जिल्ह्यात 3 महिन्यांत वाढले 60 हजारांवर मतदार; दिव्यांग व‌ 85 वर्षांवरील वृद्धांचे शुक्रवारपासून मतदान

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २३ जानेवारीला ३५,९६,२०६ मतदार होते. तर १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३६,५६,८०३ झाली आहे. 3 महिन्यांत तब्बल ६०,५९७ मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरू शकतात.
solapur
voter personsakal
Updated on

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २३ जानेवारीला ३५ लाख ९६ हजार २०६ मतदार होते. तर १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या ३६ लाख ५६ हजार ८०३ झाली आहे. तीन महिन्यांत तब्बल ६० हजार ५९७ मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरू शकतात.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ हजार ४३० दिव्यांग मतदार असून त्यापैकी १३२ जणांनीच घरून मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. तर ८५ वर्षांवरील २७ हजार २८० मतदार असून त्यापैकी एक हजार ३१८ जण घरून मतदान करतो म्हणाले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील ५२९ मतदार असून त्यांचे मतदान पोस्टल बॅलेटद्वारे घेतले जाणार आहे. घरून मतदान करणाऱ्यांची मतदान प्रक्रिया २६ ते ३० एप्रिल या काळात होणार आहे. त्या मतदानावेळी निवडणूक कर्मचारी, पोलिस असे कर्मचारी व व्हिडिओग्राफर देखील त्याठिकाणी असणार आहे.

निवडणुकीसाठी सध्या १९ हजार ८२७ कर्मचारी असून ज्यांची खरोखर अडचणी होत्या त्यांची ड्यूटी रद्द करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता अंमलबजावणी व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात १९६ क्षेत्रीय अधिकारी, २८ स्थिर सर्व्हेक्षण अधिकारी, २४ भरारी पथके, २४ व्हिडिओ सर्व्हेक्षण पथके, सहा व्हिडिओ निरीक्षण पथके आणि सहा खर्चासंबंधीची पथके नेमल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

बूथ एजंटांना मोबाईल नो अलाऊड

मतदानादिवशी बूथ एजंट म्हणून काम करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्याठिकाणी केवळ मतदान केंद्राध्यक्षांकडेच मोबाईल असणार आहे. त्याशिवाय इतर कोणाकडेही मोबाईल नसेल, याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान करायला जाणाऱ्या व्यक्तीलाही मोबाईल शूटिंग करता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन लाख लिटर दारू व २० लाखांची रोकड जप्त

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमेवर ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. आतापर्यंत त्याठिकाणी एक लाख ९५ हजार लिटर दारू व २० लाख ३३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम पोलिसांकडे जमा असून ती रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी वापरली जात होती याची खात्री केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.