Devendra Fadnavis: मुंबईत आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क होणार; हिरे व्यापाऱ्याबद्दल फडणवीसांचे उत्तर

devendra fadnavis
devendra fadnavis Sakal
Updated on

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. मुंबईवरुन डायमंड इंडस्ट्री गुजरातला जात आहे, असा प्रश्न विरोधकांनी विचारला. यावर फडणवीस म्हणाले, सुरत शिवाजी महाराजांच्या काळापासून डायमंडचं मार्केट आहे.

मुंबईमध्ये नवीन जेम्स अँड ज्वेलरी पार्कला आपण जागा दिली आहे. देशातला सर्वात आधूनीक जेम्स अँड ज्वेलरी पार्क आपण तयार करत आहोत. मुंबईमध्ये उत्पादन करण्याचे ठरले आहेत. आपल्याकडून उद्योग बाहेर जात नाहीत तर येत आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण निर्यात करतो. सुरतमध्ये उत्पादन होते. सुरतला जरी उत्पादन होत असलं तरी आपल्याकडून एकही उद्योग सुरतला गेला नाही. मुंबई भारत डायमंड कंपनीतील कामगारांनी सांगितंल की आपल्याला शिफ्ट व्हायचं नाही. आपल्याकडे उद्योग वाढतो आहे. भारतामध्ये ३८ बिलियन डॉलर  जेम्स अँण्ड ज्वेलरीची निर्यात हे आपण एकट्या मुंबईतून करतो. जे एकून निर्यातीच्या ७५ टक्के आहे. सुरतचा वाटा १२ टक्के आहे. तर जयपूरचा वाटा ३.१२ टक्के आहे.

devendra fadnavis
Jagdeep Dhankhar : मी सुद्धा २० वर्षांपासून असाच अपमान सहन करतोय... नकलेवरून मोदींनी केला उपराष्ट्रपतींना फोन

पॉली डायमंडच्या एकून निर्यातीपैकी ९७ टक्के आहे.कोरावा काळात आपल्यालाल भारत डायमंड गुड्स आपल्याला सांगते होते की आम्हाला निर्यात करु द्या.पण आपण त्यांना उघडू दिलं नाही. परिणाम असा झाला की २०-२१ मध्ये आपली निर्यात ९४ टक्क्यांनी खाली आली. २ टक्के सुरतची निर्यात ७ टक्क्यांवर आली. मी देखील त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. की येथे निर्यातीसाठी परवानगी दिली नाही. त्यांनी खूप उशीरा परवानगी दिली. ८ महिने निर्यात बंद ठेवली होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  (Latest Marathi News)

devendra fadnavis
Jagdeep Dhankhar: "मी स्वत:ची आहुती देईन, पण माझ्या समाजाचा..."; जगदीप धनखड राज्यसभेत आक्रमक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.